SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलसाठी धोक्याची घंटा, यंदाच्या सिझनमध्ये झालं असं काही..

जगात कधीही काहीही ट्रेंड होत असते. जगातील क्रिकेटप्रेमी उन्हाळ्यात घरबसल्या आयपीएल पाहत असतात, हे आपल्याला माहीतच आहे. नेहमीच ट्रेंड मध्ये असणाऱ्या IPL बाबत आता एक मोठी घडामोड प्राप्त झाली आहे. यामुळे आयपीएलचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

BARC (ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल) च्या फ्रेश आकडेवारीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या आयपीएलच्या या 15 व्या सीझनमध्ये मागच्या आठवड्यात लाईव्ह सामन्यात TRP मध्ये 33 टक्के घसरण पहायला मिळाली. 2021 वर्षाच्या तुलनेत यावर्षी दुसऱ्या सिझनमध्ये 14 टक्के अधिक घट झाली आहे. म्हणजेच यावेळी प्रेक्षकसंख्येलाही जबर फटका बसला आहे.

Advertisement

जाहिरातदार कंपन्यांच्या मतानुसार..

आयपीएलशी संबंधित काही जाहिरात कंपन्यांनी 2022 च्या ऑन एअर कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. यंदा आयपीएलचे रेटिंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आले नाही. तसेच त्यामध्ये रोज घसरण होतेय. यापूर्वी आयपीएलचे रेटिंग (IPL TV Rating) याप्रकारे कधीही घसरले नव्हते. यंदा ते 20 ते 30 टक्क्यांनी घटले असल्याची माहीती आहे.

Advertisement

आम्ही मागच्या दरांच्या तुलनेत यंदा 25 टक्के अधिक पैसे मोजावे लागले. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेटिंगचे रेकॉर्ड ब्रेक व्हायला हवे होते. पण तसं झालंच नाही. सन टिव्ही सध्या टॉपवर असून एमएए टिव्ही दुसऱ्या आणि स्टार स्पोर्ट्‌स नेटवर्क प्रसिद्धीच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे.

दरम्यान आयपीएल स्पर्धेत या गुंतवणूकदार म्हणा किंवा जाहिरातदार म्हणा हे जाहिरातींसाठी करोडो रुपये देऊन पैसे अडकवत असतात. यामुळे टीआरपीमध्ये घसरण होणे याचा मोठा परिणाम आयपीलवर होत आहे. त्यासंबंधित अनेक स्तरातून अशाही प्रतिक्रिया येत आहेत की, सध्या लोक मोठमोठ्या बजटचे धमाकेदार सिनेमे पाहत आहेत तर बहुतांश जण वेबसीरिज मध्ये रस दाखवत आहे. याचा परिणामही आयपीएलच्या टीआरपीवर होत असतो, असं सांगितलं जातंय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement