SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेल भरताना ‘या’ 4 गोष्टी कायम ठेवा लक्षात; नाहीतर नक्कीच होईल आर्थिक नुकसान

मुंबई :

सध्या पेट्रोल आणि डीझेलने सामान्य नागरिकांना नको नको करून सोडले आहे. वेगेवेगळ्या कारणांमुळे इंधनाचे सर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सामान्य माणसाचे बजेट बिघडले आहे. भविष्यात इंधनाच्या किंमती कमी होण्याची काही चिन्हे नाहीत. इंधन कंपन्या आणि सरकार इंधनाचे दर कमी करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे आता वरचेवर आपली जी फसवणूक पेट्रोल पंपावर होत असते, ती कशी टाळता येईल, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

Advertisement

देशभरात विविध ठिकाणी मीटर मध्ये छेडछाड करून पेट्रोल कमी दिले जाते. तसेच आजवर अनेक अशा घटना समोर आल्या आहेत कि, पंपावर ठरलेल्या किमतीपेक्षा कमी पेट्रोल व डिझेल भरले गेले. अनेक लोकांनी तर 100 ते 200 ग्रॅम कमी इंधन मिळतेय, असाही आरोप करत पुरावे दिलेले आहेत. मग अशावेळी आपण काय काळजी घ्यावी, हे लक्षात घ्यायला हवे.

  • पेट्रोल भरण्यापूर्वी पंपावरील मशीन मध्ये झीरो रिडिंग आहे का? हे तपासा.
  • मशीन अचानक शून्य ते 20 किंवा त्यापेक्षा वेगाने पळत तर नाही ना, हेही आवर्जून पाहा. कारण मीटर मध्ये छेडछाड करने, हे सहज शक्य आहे.
  • पेट्रोल भरण्यापूर्वी फ्यूल डेंसिटी पाहायला हवी. पेट्रोलसाठी फ्यूल डेसिंटी 720–775 kg/m3 आणि डिझेल साठी 820–860 kg/m3 असते.
  • पेट्रोल सकाळी किंवा सायंकाळी भरल्यास 3 ते 5 रुपयांची बचत शक्य आहे. दुपारच्या उन्हात पेट्रोलचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. त्यामुळे इंधन भरताना आसपासचे तापमान कमी असल्यास इंधनावरील खर्चाची बचत होऊ शकते.

Advertisement