SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ईस्टर संडे’ का साजरा केला जातो? ‘या’ दिवसाचं महत्व जाणून घ्या..

आज ‘ईस्टर संडे’.. आनंद नि उत्साहाचा हा दिवस.. जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठीचा खास दिवस.. ख्रिस्ती धर्मात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी शनिवारी (ता. 16) मध्यरात्रीपासून शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली आहे. हा दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व जाणून घेऊ या..

‘ईस्टर संडे’च्या तीन दिवस आधी, म्हणजेच ‘गुड फ्रायडे’ला प्रभू येशूंना क्रुसावर चढवलं होतं.. या घटनेच्या तीन दिवसांनंतर (रविवारी) प्रभू येशूनं पुन्हा जन्म घेतल्याचं मानलं जातं.. त्यामुळे ख्रिश्नन बांधव दरवर्षी हा दिवस ‘ईस्टर संडे’ म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करतात..

Advertisement

‘ईस्टर’ दरवर्षी निश्चित तारखेला येत नाही, तर 21 मार्चनंतर पूर्ण चंद्र दिसल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी ‘ईस्टर’ हा सण साजरा केला जातो.. आज (ता. 17) जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे..

ईस्टर संडे कसा साजरा करतात..?
– जर्मनीत काही ठिकाणी उंचावरून अंडे खाली ढकलत न्यायचे. जो कोणी अंडे न फोडता खाली आणेल, तो विजेता.
– काही ठिकाणी ‘ईस्टर बनी’ला लहान मुले आपल्या इच्छा सांगणारे पत्र लिहितात. त्यांच्या पत्राला ‘पोस्ट ऑफिस’मधील कर्मचारी ‘ईस्टर बनी’ म्हणून उत्तर पाठवतात.

Advertisement

– अनेक बागांमध्ये लपवलेली अंडी मुलांनी शोधायची स्पर्धा असते.
– प्रोटेस्टंट पंथीय लोकात ‘प्रभू उठला आहे..’ असे म्हणून स्वागत केलं जातं, समोरची व्यक्ती ‘हो, खरंच प्रभू उठला आहे..’ असं म्हणून त्यास प्रत्युत्तर देतो.

‘ईस्टर संडे’ला चर्चमध्ये ख्रिस्त धर्मीय बांधव प्रार्थनेसाठी गर्दी करतात. ‘ईस्टर’च्या निमित्ताने ख्रिस्त धर्मीय लोकं चर्चमध्ये मेणबत्ती पेटवून प्रार्थना करतात.. येशूच्या अस्तित्वाविषयी आभार व्यक्त करतात. ईस्टरच्या निमित्ताने काही ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतो.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement