SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरे देवा हे काय झालं; आयपीएलमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव, ‘या’ टीमला बसणार फटका

मुंबई :

आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामातील 24 सामने खेळले गेले आहेत, परंतु 25 व्या सामन्यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Advertisement

दरम्यान याबाबत खुद्द आयपीएलने माहिती दिली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. फरहार्ट सध्या संघासोबत प्रवास करणार नसून त्यांना किमान एक आठवडा क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल.

आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे UAE मध्ये खेळला गेला होता, तर IPL 2021 चा अर्धा भाग कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलावा लागला होता. IPL 2021 चा पहिला भाग भारतात खेळला गेला, तर IPL च्या 14 व्या हंगामाचा दुसरा भाग UAE मध्ये आयोजित करण्यात आला. आता IPL 2022 चे सामने फक्त मुंबई आणि पुणे येथेच खेळवण्यात येत आहेत.

Advertisement

दरम्यान आजही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच आता आयपीएल या लोकप्रिय खेळात कोरोनाचा शिरकाव झाल्याने धाकधूक वाढली आहे. अद्याप बरेसचे सामने शिल्लक असून आता आणखी काळजी घेणे गरजेचे ठरू लागले आहे.

Advertisement