SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दारू पिऊन धार्मिक स्थळी प्रवेश; ‘या’ मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल

मुंबई :

“मां कसम मैंने 1 जनवरी से शराब पूरी तरह छोड़ दिया है अब इसे कभी हाथ भी नहीं लगाऊंगा”, अशी शपथ घेऊनच पंजाबचे मुख्यमंत्री निवडणुकीत उतरले. कारण यापूर्वी त्यांच्यावर अनेकदा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गेल्याचे आरोप झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना आणि तक्रार समोर आली आहे.

Advertisement

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याविरोधात पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी केली असून सीएम मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे.

आता यावर पोलीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पंजाबच्या पोलिस महासंचालकांना त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती केली.

Advertisement

दरम्यान अजून एका प्रकरणावरून मान यांना माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. शुक्रवारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत सिंग मान यांनी देशभरात 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या बैसाखीच्या मुहूर्तावर मद्यधुंद अवस्थेत तख्त दमदमा साहिबमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement