SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘आरसी’ बनवण्याच्या नियमांत बदल, नागरिकांचा होणार मोठा फायदा..!

वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. अर्थात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’… एक असं सरकारी कागदपत्रं, ज्यावर तुम्ही देशात कुठेही वाहन चालवू शकता.. शिवाय ओळखपत्र म्हणूनही ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा वापर होतो. हे कागदपत्रं नसताना, वाहन चालविल्यास मोठी दंडात्मक कारवाई केली जाते.

‘आरटीओ’कडून ठराविक काळासाठी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving License) जारी केलं जातं. हा ठराविक काळ पूर्ण झाल्यावर पुन्हा ‘लायसन्स’चं नूतनीकरण करावं लागतं.. जूनं ‘लायसन्स’ रिन्यू न केल्यास, ते रद्द समजून तुमच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते..

Advertisement

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ व ‘आरसी’ (वाहन परवाना) बनविण्याचे अनेक नियमांत मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत.. त्यामुळे नागरिकांची मोठ्या समस्यांपासून सुटका होणार आहे. शिवाय, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (DL) मिळवणं, आता पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

‘हे’ नियम बदणार..

Advertisement

टेस्टसाठी ‘व्हॉइस सिस्टम’ : नागरिकांना ‘लर्निंग लायसन्स’साठी ऑनलाईन टेस्ट द्यावी लागते. मात्र, अल्पशिक्षित, निरक्षर, तसेच संगणकाचे ज्ञान नसणाऱ्या लोकांना ही परीक्षा देताना अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन ऑनलाईन टेस्टसाठी आता ‘व्हॉइस सिस्टम’ सुरू होणार आहे. त्यासाठी ‘एनआयसी’ (NIC) द्वारे ‘व्हॉईस सिस्टम’ सॉफ्टवेअर विकसित केलं जात आहे.

ई-संपर्क केंद्रांवर अपॉइंटमेंट सिस्टम : ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ व ‘आरसी’ बनवण्यासाठी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम’ सुरू केली जाणार आहे. ही सेवा ‘आरएलए’द्वारे ‘ई-संपर्क केंद्रा’वरही मिळेल. ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नसणाऱ्या लाेकांना ई-संपर्क केंद्राची मदत होणार आहे. तेथे ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेता येणार आहे.

Advertisement

नवीन वाहनांची नोंदणी डीलर पॉईंटवर : नवीन वाहनाची नोंदणी (आरसी) आता ‘ऑटो डीलर पॉईंट’वरच केली जाणार आहे. त्यासाठी वाहन (दुचाकी आणि चारचाकी) खरेदी करताना नोंदणी क्रमांक दिला जाईल. लवकरच डीलर पॉईंटवर ‘आरसी’ जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केलं असून, त्यात सर्व ऑटो डीलर्स, ऑटो मोबाईल कंपन्या, एजन्सी मालकांना जोडलं जाणार आहे.. त्यामुळे नवी गाडी घेतल्यावर त्याच्या नोंदणीसाठी ‘आरएलए’ कार्यालयात जावं लागणार नाही.

दरम्यान, ‘आरसी’ बनवण्यासाठी डीलर्सना एकसमान दर आकारावा लागेल.. फॅन्सी नंबरसाठी मात्र ‘आरएलए’च्या ई-लिलावात भाग घ्यावा लागेल, असं नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement