SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हाॅटस् ॲप’वर करा एकाच वेळी 32 जणांना काॅल..! ‘व्हाॅटस् ॲप’ आणणार ‘हे’ धमाकेदार फीचर्स..!

सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारं सोशल मेसेजिंग ॲप म्हणजे, अर्थातच ‘व्हाॅटस् ॲप’..! आपल्या युजर्ससाठी ‘व्हाॅटस् ॲप’ सतत नवनवीन फिचर्स आणते.. नि त्याचा युजर्सला मोठा फायदा होत असल्याचेही दिसते..

सुरुवातीच्या दिवसांत फक्त एकमेकांना मेसेज पाठवण्यापुरता ‘व्हाॅटस ॲप’चा वापर होत होता. मात्र, त्यानंतर या सोशल मीडिया ‘ॲप’ युजर्ससाठी विविध फीचर्स आणली आहेत.. मेसेज, फोटो वा व्हिडीओ पाठवणे, ऑडिओ वा व्हिडीओ काॅलची सोयही ‘व्हाॅटस ॲप’वर करण्यात आली होती. आता तर या ‘ॲप’च्या माध्यमातून आर्थिक व्यवहारही करता येत आहेत.

Advertisement

युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन ‘व्हाॅटस ॲप’ने आपले ही फीचर अधिक अपग्रेड केलं आहे. आता वेगवेगळ्या ग्रुपमधील लोकांसाेबतही ‘चॅट’ करता येणार आहे. त्यासाठी ‘कम्युनिटी फिचर’मध्ये बदल केले जाणार आहेत.

येत्या काही आठवड्यांमध्ये ‘व्हॉटस्ॲप’कडून हे फिचर सुरू होण्याची शक्यता आहे. तशी माहिती ‘व्हॉटस्ॲप’नेच आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

Advertisement

‘व्हॉटस्ॲप’चे नवे फिचर्स…

  • युजरला तात्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी ‘टेक्स्ट टाईप’ करावं लागतं होतं. हे टाळण्यासाठी अधिक सोप्या पद्धतीने, तात्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी ‘व्हॉटस्ॲप’नं ‘इमोजी रिॲक्शन’चे फिचर दिलं..
  • कुणी चुकीची, आक्षेपार्ह किंवा तणाव निर्माण करणारी ‘पोस्ट’ टाकल्यास ती ‘डिलीट’ करण्याचे अधिकार ॲडमिनला मिळाला आहे..
  • ‘व्हॉटस्ॲप’च्या माध्यमातून काही माहिती पोहोच करायची असेल, एकमेकांना अपडेट करायचं असेल, तर त्यासाठी 2 जीबी साईजची फाईल शेअर करता येणार आहे..
  • एखाद्या विषयावर चर्चेसाठी वेगवेगळ्या ग्रुप्सना एकत्र आणता येईल. चर्चेमध्ये कुणाला घेणे- न घेणे, कोणत्या ग्रुपला समाविष्ट करणे, याचे अधिकार ‘ॲडमिन’ला दिले जाणार आहेत.
  • काही ग्रुपपुरत्या असलेल्या चर्चा, तसेच चॅटिंग आता अधिक विस्तारता येणार आहे.

एकाच वेळी 32 युजर्सना कॉल
अनेकदा केवळ चॅटिंग पुरेसं नसतं, तर थेट बोलण्याची गरज असते. त्यासाठी ‘व्हॉट्सॲप’ एकाच वेळी 32 युजर्सना कॉल करण्याची सोय उपलब्ध करुन देणार आहे. केवळ एका टॅपवर असा फोन करता येणार आहे. सध्या 8 जणांमध्ये ‘ग्रुप कॉल’ करता येतो. ‘व्हॉटस्ॲप’वर ग्रुप कॉलिंगची सुरुवात 4 जणांपासून झाली होती.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement