SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विरोधक एकवटले, देशभरात BJP ला धक्का; बघा, एक लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांचे काय लागले निकाल

मुंबई :

देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) एक लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेसाठी, तर महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगड विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी काही ठिकाणी  मतमोजणी सुरू आहे तर कही ठिकाणी झाली आहे.

Advertisement

महाराष्ट्रात लागलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार व कॉंग्रेस नेत्या जयश्री जाधव या विजयी झालेल्या आहेत. बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हाही विजयी झाले आहेत. ते आसनसोल लोकसभा जागेसाठी टीएमसीचे उमेदवार होते. तर बाबुल सुप्रियो येथील बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. एकूणच काय तर विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला धक्का दिला आहे.

बोचहां विधानसभा मतदारसंघातही आरजेडीने शानदार विजय मिळवला आहे. आरजेडीचे उमेदवार अमर पासवान बीजेपी उमेदवाराला आसमान दाखवत विजय मिळवला आहे. बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हा तर मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. यावेळी सगळीकडे भाजपाला पराभव स्वीकारावा लागत आहे. भाजपाचे सध्याचे जे राजकारण चालू आहे, ते लोकांना रुचलेले नाही म्हणूनच लोकांनी केंद्रात सत्ता असलेल्या पक्षालासुद्धा मत देणे, टाळले आहे.

Advertisement

महाराष्ट्रात कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या साथीने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव या 96226 इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 77426 इतकी मत मिळाली आहे.

Advertisement