SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जर खेळवायचं नव्हतं तर एवढे पैसे कशाला खर्च केले; ‘त्या’ खेळाडूने मुंबई इंडियन्सवर डागली तोफ

मुंबई :

मुंबई इंडियन्सलं सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. या पराभवाला दरवेळी काही न काही कारण मिळत आहे. त्यामुळे आता टिकायचे असेल तर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना फक्त ‘जिंकणे’ हा एकमेव पर्याय उरला आहे. सलग 5 वेळा आयपीएलमध्ये विजय मिळवल्यावर सलग 5 वेळा पराभवाचा सामना करण्याची नामुष्की मुंबई इंडियन्स संघावर ओढवली आहे. सगळेच लोक आता मुंबई इंडियन्सच्या पराभवाची चर्चा करत आहेत. अशातच आता एका खेळाडूने मुंबई इंडियन्सवर तोफ डागली आहे.

Advertisement

‘जर मुंबई इंडियन्सला खेळायची संधी द्यायची नव्हती, तर त्यांनी लिलावात एवढे पैसे खर्च तरी कशाला केले’, असा सवाल भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने विचारला आहे. पुढे त्याने म्हटले की, मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचे काहीच कळत नाही. कारण लिलावात त्यांनी तब्बल आठ कोटी रुपये टीम डेव्हिडसाठी मोजले, पण फक्त एकाच सामन्यात संधी देत त्यांनी त्याला संघाबाहेर केले.

रायली मेरेडिथसारखा चांगला गोलंदाज त्यांनी संघात घेतला आहे, पण त्यालाही आतापर्यंत एकदाही संधी दिली नाही. त्यामुळे जर या खेळाडूंना संधीच द्यायची नव्हती तर त्यांच्यावर लिलावात पैसेच का खर्च केले?, असे म्हणत आकाश चोप्राने मुंबई इंडियन्सचे वाभाडे काढले. कायरन पोलार्ड सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण तरीही त्याला खेळण्याची संधी मिळत आहे, असेही पुढे आकाशने सांगितले.

Advertisement