SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विवेक अग्निहोत्री यांच्याकडून नव्या चित्रपटाची घोषणा, आता मांडणार दिल्लीच्या वेदना..?

‘द काश्मीर फाईल्स’ बाॅलिवूडमधील यंदाचा यशस्वी चित्रपट.. या चित्रपटाने तब्बल 250 कोटींचा गल्ला जमवला.. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अर्थात, त्यावर उलट-सूलट प्रतिक्रियाही उमटल्या. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं, तर काहींनी विरोधात मत मांडलं..

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यामध्ये अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतर अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.. ‘द काश्मीर फाईल्स’ला मिळालेल्या (The Kashmir Files) अभूतपूर्व यशानंतर विवेक अग्निहोत्री यांचा पुढचा चित्रपट कोणता असेल, असा सवाल उपस्थित होत होता.

Advertisement

खुद्द विवेक अग्निहोत्री यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिलंय.. त्यांनी नुकतीच नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘ट्विटर’वर विवेक यांनी ‘#TheDelhiFiles’ असा हॅशटॅग लिहिला आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री लवकरच ‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.

ट्विटमध्ये काय..?
‘द काश्मीर फाईल्स बनवण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत केली. लोकांना नरसंहार आणि काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, याची जाणीव करून देणं महत्त्वाचं होतं. आता नव्या चित्रपटावर काम करण्याची माझी वेळ झाली आहे’, असं ट्विट अग्निहोत्री यांनी केलं आहे.

Advertisement

विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटनंतर त्यावर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी ‘तुमच्या या चित्रपटालाही यश मिळो’, असं म्हटलंय, तर ‘सत्य समोर येण्याची आम्ही वाट पाहत आहोत’ असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. ‘दिल्लीच्या अशा अनंत यातना आहेत, ज्या कव्हर करता येतील,’ असंही एकाने म्हटलंय.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातून 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली होती. आता ‘द दिल्ली फाईल्स’मधून विवेक अग्निहोत्री कोणाची कथा मांडतात, याबाबत नेटकऱ्यांमध्ये कुतुहूल निर्माण झालं आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement