SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ना कागदपत्रांची झंझट ना इकडे-तिकडे चकरा; टाटाने कार खरेदी केली जेवण ऑर्डर करण्याइतकी सोपी

मुंबई :

मिठापासून ते स्टीलपर्यंत उत्पादन करणाऱ्या टाटा या कंपनीने आपले सुपर अॅप लाँच केले आहे. टाटाचे सुपर अॅप Tata Neu आता लाईव्ह झाले आहे. हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे कंपनी Amazon, Flipkart, Paytm आणि इतर सुपर अॅप्सशी स्पर्धा करणार आहे. मात्र या अॅपच्या माध्यमातून एक मोठी गोष्ट घडणार आहे. कार खरेदी करणे, हे जेवण ऑर्डर करण्याइतकं सोपं होणार आहे.

Advertisement

जर तुम्ही नवीन कार खरेदी करीत असाल, तर अनेक प्रकारचे दस्ताऐवज आणि प्रक्रियांमधून तुम्हाला जावं लागतं. एका शोरूममधून दुसऱ्या शोरूममध्ये आपण फिरत राहतो.मात्र आता ही सगळी झंझट टाटांच्या या एका अॅपने संपली आहे. टाटा ग्रुपने नुकतेच एक Tata Neu हे ऍप लॉंच केले आहे. कंपनी आता याच ऍपच्या माध्यमातून प्रवासी वाहनांची विक्री करणार आहे. आणि तीही एकदम सोप्या आणि तणावमुक्त पद्धतीने.

 

Advertisement

तुम्हाला Tata Neu वर फूड डिलिव्हरीचा पर्याय देखील मिळेल. यामध्ये टाटाच्या ताज ग्रुपच्या हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय असेल. आणि अगदी जेवण ऑर्डर करण्याइतकी कार खरेदीची सोपी प्रोसेस असणार आहे. तुम्ही Tata Neu अॅपवरही गुंतवणूक करू शकता. यामध्ये, झटपट वैयक्तिक कर्जापासून ते डिजिटल सोने, विमा आणि इतर अनेक विशेष योजना उपलब्ध आहेत. होम अवे सिक्योर प्लॅन, कार्ड फ्रॉड सिक्योर प्लॅन यांसारख्या योजनाही यावर उपलब्ध आहेत.

Advertisement