SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेलपासून हवीय सुटका? मग बाजारात येणाऱ्या ‘या’ तीन सीएनजी कारबद्दल घ्या जाणून..

महागाईच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर जरी वाढत असले तरी त्यामानाने सीएनजीचे दर कमीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सीएनजीचे दर सध्या पाच-पाच रुपयांनी वाढत आहेत पण पेट्रोल-डिझेलपेक्षा ते जास्त परवडत असल्याने अनेक जण सीएनजी कार घेण्यात इंटरेस्ट दाखवतात. यामुळे कारची मागणी वाढत आहे आणि म्हणूनच अनेक कंपन्या सर्वच वाहने आता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध करत आहेत.

जगातील काही टॉपच्या कंपन्या आहेत, या कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या लेटेस्ट मॉडेलमध्ये सीएनजी पर्याय देण्याचा विचार करत आहेत. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी (बलेनो, सियाझ, ब्रेझा), ह्युंदाई (व्हेन्यू), टाटा (पंच, नेक्सॉन) आणि टोयोटा (इनोव्हा क्रिस्टा) यांसोबतच ऑटोमेकर्सकडून सीएनजी हॅचबॅक, सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एमपीव्ही गाड्यांचा समावेश असेल. अशा टॉपच्या कंपन्यात मारुती सुझुकीचाही नंबर लागतो.

Advertisement

तुम्हालाही मारुती सुझुकीच्या काही लोकप्रिय गाड्यांचे सीएनजी व्हेरिएंट घ्यायचे असेल तर वाचा..

मारुती बलेनो सीएनजी (Maruti Baleno CNG)

Advertisement

इंडो-जॅपनीज ऑटोमेकर आपल्या Arena आणि Nexa उत्पादन लाइनअपमध्ये CNG चे काही खास मॉडेल्स जून 2022 पर्यंत लाँच करण्याचा प्लॅन करत आहे. नवीन मारुती बलेनोचे सीएनजी व्हेरियंट येत्या काही महिन्यांत रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. मॉडेल 1.2-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन वापरेल, ज्यामध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट असेल. गॅसोलीन युनिट 89PS कमाल पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करते. नियमित पेट्रोल मॉडेल 22kmpl पेक्षा जास्त मायलेजचा दावा करते, CNG व्हेरिएंट 25kmpl मायलेज देऊ शकते असा अंदाज आहे.

मारुती स्विफ्ट सीएनजी (Dzire CNG)

Advertisement

मारुती सुझुकी या प्रसिद्ध कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅकपैकी एक असे स्विफ्टचे काही दिवसांतच सीएनजी व्हेरियंट लाँच केले जाणार आहे. Dzire CNG प्रमाणे, मारुती स्विफ्ट CNG 1.2-लिटर ड्युअल जेट K12C पेट्रोल इंजिन आणि CNG किटसोबत येणार आहे. CNG मोडमध्ये, हॅचबॅक 70bhp पीक पॉवर व 95Nm पीक टॉर्क जनरेट करेल, असा कंपनीचा दावा आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी (2022 Maruti Brezza CNG)

Advertisement

मारुती सुझुकी आपले 2022 मारुती ब्रेझा सीएनजी व्हेरियंट नवीन लुक आणि फीचर्ससह आणण्यासाठी सज्ज आहे. जेणेकरुन या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon च्या ग्राहकांना आकर्षित करू शकेल. नेक्स्ट जनरेशन Brezza बद्दल सांगायचं झालं तर, प्राप्त माहितीनुसार, या गाडीमध्ये समोर नवीन ग्रिलसह, नवीन बंपर, ट्विन पॉड हेडलॅम्प आणि A-शेप LED DRL दिसतील. यासोबतच नवीन फ्रंट फेंडर्स आणि नवीन डिझाइन असलेले ड्युअल टोन अलॉय व्हील येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement