SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हातारपणाची सोय आताच करा; दरमहा छोटीशी गुंतवणूक करून मिळवा 50 हजारांची पेन्शन

National Pension System ही जेष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची सरकारी योजना आहे. ज्यातून आपल्याला खूप चांगला फायदा मिळवता येतो. ही योजना जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा तसेच ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. ही योजना दरवेळी आकर्षक बनवली जाते, कारण लोकांनी या योजेनेचा फायदा घ्यावा.

सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना म्हातारपणाची फारशी चिंता नसते पण खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांना मात्र आपल्या म्हातारपणाची सोय करावी, ही गोष्ट नेहमीच लक्षात असते. आणि याच लोकांसाठी ही नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) आहे. याद्वारे गुंतवणूक करून, तुम्ही निवृत्तीसाठी एक मोठा निधी बनवू शकता जेणेकरून पेन्शन नियमितपणे येत राहील.

Advertisement

जाणून घ्या योजनेविषयी :-

  • जर एखाद्याने वयाच्या 21 व्या वर्षापासून NPS मध्ये दर महिन्याला 4,500 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तो 39 वर्षांसाठी गुंतवणूक करेल. म्हणजेच 54,000 रुपये वार्षिक दराने, 39 वर्षांमध्ये त्यांची गुंतवणूक 21.06 लाख रुपये होईल.
  • एनपीएसमध्ये सरासरी 10 टक्के परतावा दिल्यास,मॅच्युरिटीवर त्याला 2.59 कोटी रुपये मिळतील. त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. ही गणना अंदाजानुसार करण्यात आली आहे. तसे, NPS मध्ये सरासरी 8 ते 12 टक्के परतावा मिळतो.

Advertisement