SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’ कारणावरून वसंत मोरे आणि मनसेत पुन्हा मतभेद; पक्षाला दिला घरचा आहेर

पुणे :

गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नव्या भूमिका घेतल्या. हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर मशिदींवरील भोंग्यावर साधलेला निशाणा यांमुळे राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं. यानंतर पुणे मनसे नेते वसंत मोरे आणि मनसेत दुरावा आला आणि पुढच्या 8 दिवसात दूरही झाला. मात्र आता पुन्हा राज ठाकरेंच्या पुणे दौरा निमित्ताने मनसे आणि वसंत मोरे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत.

Advertisement

मनसेकडून (MNS) उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आज ते पुण्यात दाखल झाले. उद्या त्यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे. मात्र या मोरे यांची नेमकी स्पष्ट भूमिका काय आहे? ते अद्याप समजू शकलेलं नाही. कारण पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात होणाऱ्या महाआरतीच्या कार्यक्रमात जाण्याबाबत आपण अजून ठरवलेलं नाही, तसेच तो पक्षाचा कार्यक्रम आहे का ते माहिती नाही, असं वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, उद्या कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे. हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या पत्रिकेवर कुठेही मनसेचं नाव नाही, तो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही हे माहीत नसल्याने अजून ठरवलं नाही. हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जायचं की नाही अजून ठरवलं नाही, उद्या सकाळी राज ठाकरे यांची भेट घेणार असून आपली भूमिका मांडणार आहे.

Advertisement