SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जिओच्या ‘या’ ऑफरने मार्केटमध्ये धुमाकूळ; फुकट मिळतोय जिओफोन

मुंबई :

जिओ कंपनी नेहमीच मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला तयार असते. दरवेळी काहीतरी भन्नाट अशा ऑफर्स घेऊन जिओ मार्केटवर कब्जा करत असते. आता यावेळीही जिओ ने अशी ऑफर आणली आहे, जी यापूर्वी कुणीच दिली नव्हती. सामान्य लोक सवर्साधारणपणे आपल्या बजेट मधील फोन घेत असतात मात्र यावेळी जिओने चक्क फुकट फोन घेऊन जाण्याची ऑफर दिली आहे.

Advertisement

आता जियोनं एक नवीन प्लॅन सादर केला आहे. ज्यात तुम्हाला कॉल्स आणि डेटा तर मिळतोच परंतु सोबत लोकप्रिय JioPhone मोफत दिला जात आहे.

काय आहे नेमकी ऑफर :-

Advertisement

1,499 रुपयांचा एक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनसोबत तुम्हाला JioPhone फ्री दिला जात आहे आणि 1 वर्षाची वैधता दिली जाते.

तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल वर्षभर अमर्याद कॉल्स करता येतील. सोबत 24 जीबी डेटा आणि जियो अ‍ॅप्सचं सब्स्क्रिप्शन मोफत दिलं जाईल.

Advertisement

या जिओ फोनविषयी :-

जियो फोन हा एक 4G फीचर फोन आहे. 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज मिळते. या फिचर फोनमध्ये 2-MP रियर कॅमेरा आणि एक वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. जियो फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Advertisement