SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांची डिझेलच्या खर्चातून होणार सुटका, केंद्र सरकारच्या ‘या’ खास योजनेचा लाभ घ्या..!

गेल्या काही दिवसांपासून रोजच इंधनाचे दर वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलंय.. शेती व्यवसाय आता बऱ्यापैकी यांत्रिकीकरणावरच चालतो.. डिझेलच्या दरवाढीमुळं हा व्यवसायही अडचणीत आलाय.. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चालला असून, त्या प्रमाणात शेतमालाला दर मिळत नाही..

विजेच्या समस्येमुळे अनेक शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी जनरेटर वापरतात. मात्र, डिझेलच्या किमती वाढल्याने आता जनरेटर वापरणंही मुश्किल झालंय.. अशा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं खास योजना सुरु केलीय.. त्यामुळे विजेची समस्या जाणवणार नाही, तसेच डिझेलच्या दरवाढीतूनही शेतकऱ्यांची सुटका होईल..

Advertisement

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने 2019 मध्ये एक योजना सुरू केली होती. ‘पंतप्रधान कुसुम योजना’, असं या योजनेचं नाव.. ही एक सोलर पंप योजना आहे.. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा खर्च शून्यावर येऊ शकतो. उत्पादन खर्च निम्म्याने कमी होऊन, नफ्यात मोठी वाढ होऊ शकते…

अनुदान किती मिळणार..?
शेतात सोलर पंप बसवण्यासाठी पीएम कुसुम योजने अंतर्गत 75 टक्के अनुदान दिलं जातं. त्यातील 30 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून, तर 45 टक्के अनुदान राज्य सरकारकडून मिळतं.. त्यामुळे सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून केवळ 25 टक्के पैसा खर्च (PM Kusum Yojana) करावा लागताे. पीएम कुसुम योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या सोलर पंपांना विमा संरक्षणही दिलं जातं.. त्यामुळे सोलर पंपात (Solar Pump) काही बिघाड झाला, तरी विमा सुरक्षा असल्यानं शेतकऱ्यांचं काहीही नुकसान होत नाही.

Advertisement

शेतकऱ्यांना होणारे फायदे..

  • ज्या भागात अनियमित पाऊस पडतो किंवा सिंचनाची योग्य सुविधा नसणाऱ्या ठिकाणी सोलर पंप उत्तम पर्याय ठरू शकतात.
  • सूर्यप्रकाशापासून तयार होणाऱ्या उर्जेवर हे पंप चालत असल्याने वीज कनेक्शनचीही आवश्यकता नाही. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी लाईट येण्याची वाट पाहण्याची गरज नाही
  • जनरेटरसाठी, डिझेलसाठीही खर्च करण्याची गरज नाही. वीज बिलाचीही चिंता नाही, म्हणजेच जवळपास शून्य खर्चात शेतकरी आपल्या पिकाला पाणी देऊ शकतात.

सध्याच्या परिस्थितीत डिझेलचा वाढता खर्च,  विजेचे भारनियमन नि वीजबिल.. अशा अडथळ्यांना पार करण्यासाठी ‘पंतप्रधान कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार, हे नक्की..!

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement