SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडी चालवताना ‘हा’ नियम मोडल्यास होईल 12,500 रुपयांचा दंड, ‘असं’ भरावं लागणार चालान..!

वाहनांची वाढती संख्या नि त्यातून होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून वाहतूक नियमांत सातत्याने बदल करण्यात येत असतात. वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यातून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हे नियम केले जातात..

वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. अगदी तुम्हाला 12500 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकानंच वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, अन्यथा ट्रॅफिक पोलिस कारवाईचा बडगा उगारणारच..

Advertisement

कोणत्या नियमभंगासाठी किती दंड..? 

 • मोटर व्हेइकल कायद्याच्या कलम 194C नुसार दुचाकीवरून तीन जण प्रवास करीत असल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
 • याशिवाय आपात्कालिन वाहनाला रस्ता न दिल्यास 193E नुसार 10 हजार रुपयांचा दंड केला जाऊ शकतो.
 • तसेच सूर्यास्तानंतर अंधारात गाडीचा हेडलाईट सुरू न करता, वाहन चालवल्यास CMVR 105/177 MVA नुसार 1500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
 • वाहतूक नियमांचे उल्लंघन करून गाडीच्या छतावर उभा राहून डान्स करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून गाझियाबाद पोलिसांनी 20 हजार रुपयांचा दंड करुन 5 तरुणांना अटक केली होती.

अशी मिळवा दंडाची माहिती..

Advertisement

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास याआधी ट्रॅफिक पोलिस जागेवरच दंड वसूल करीत असत. मात्र, आता तुम्हाला कधी दंड झाला, हेही समजत नाही.. तुम्ही चालवत असलेल्या गाडीवर काही दंड आहे का, याची माहिती खालील प्रक्रियेनुसार जाणून घ्या..

 • सुरुवातीला https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा.
 • त्यावर ‘चेक चलन स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक व ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL)चा पर्याय दिसेल.
 • वाहन क्रमांकाचा पर्याय निवडून विचारलेली आवश्यक माहिती भरा व ‘Get Detail’ वर क्लिक केलं, की तुमच्या गाडीवर चालान आहे का नाही, याची माहिती मिळेल.

दंड कसा भरायचा..?

Advertisement

तुमच्या गाडीवर काही दंड झालेला असल्यास तो तातडीने भरुन टाका, अन्यथा भविष्यात तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. हा दंड कसा भरायचा, याबाबत समजून घेऊ या..

 • सर्वप्रथम https://echallan.parivahan.gov.in/ या वेबसाईटवर जा.
 • चालानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा.
 • नंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. त्यावर चालानचे तपशील दिले जातील.
 • तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालानासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंट कन्फर्म केल्यावर तुमचं चालान भरलं जाईल.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement