SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खळबळजनक..! ‘आयपीएल’मध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ संघातील सदस्य कोरोनाबाधित..

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. गेल्या 26 मार्चपासून सुरु झालेली इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएल आता चांगलीच रंगात आली आहे.. सामन्यांमधील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे.. त्याच वेळी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे..

काही दिवसांपूर्वीच सरकारने सगळे कोविड निर्बंध हटवले होते.. त्यानंतर भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. अनेक तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्याच वेळी आयपीएलमधून ही बातमी समोर आलीय..

Advertisement

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 25वा सामना आज (ता. 15) खेळला जात आहे. तत्पूर्वीच खेळाडूंसाठी केलेल्या ‘बायो बबल’मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने, ही स्पर्धा पुन्हा एकदा संकटात सापडली आहे.

‘दिल्ली’च्या फिजिओला कोरोना
दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ उद्या (शनिवारी) स्पर्धेतील आपला पुढचा सामना ‘आरसीबी’ विरुद्ध खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘दिल्ली कॅपिटल्स’ची मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र, या प्रकारामुळे ‘दिल्ली कॅपिटल्स’सह अन्य फ्रेंचायझीही हादरले आहेत.

Advertisement

दरम्यान, याबाबत आयपीएल (IPL) आयोजकांतर्फे अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय. ‘दिल्ली कॅपिटल्सचे’ फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, सध्या ते मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली ‘क्वारंटाईन’मध्ये आहेत. त्यांना किमान आठवडाभर क्वारंटाईन राहावे लागणार आहे. पॅट्रिक फरहार्ट यांच्याशिवाय बाकी कुणीही कोरोना पॉझिटिव्ह नाही.

भारतात दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याने संपूर्ण ‘आयपीएल’ युएईमध्ये झाली होती. 2020 मध्ये भारतात स्पर्धा सुरु झाली खरी, पण ‘केकेआर’मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नि स्पर्धेला ब्रेक लागला. त्यानंतर काही काळाने उर्वरित सर्व सामने पुन्हा ‘युएई’मध्येच घ्यावे लागले होते..

Advertisement

कोरोनामुळे यंदा ‘आयपीएल’च्या साखळी फेरीतील सर्व लढती महाराष्ट्रातील पुणे व मुंबईतील चार मैदानावर होत आहेत.. खेळाडूंसह स्टाफलाही कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचना केलेल्या असताना, ‘दिल्ली कॅपिटल्स’च्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement