SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हनुमान पूजेने होते संकटातून सुटका; जाणून घ्या हनुमान जन्मोत्सव शुभ मुहूर्त नि पूजा विधी

आज हनुमान जन्मोत्सव.. रामभक्त बजरंग बलीचा जन्मदिन.. संकट मोचन, अंजनी सूत, पवनपुत्र, मारुती अशा विविध नावांनी हनुमानास ओळखले जातं. हनुमानास भगवान शंकराचे 11वे रुद्रावतार मानलं जातं. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो, तसेच आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळत असल्याचं मानलं जातं..

हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी रामभक्त हनुमानाचा जन्म झाला.. त्यामुळे हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.. या दिवशी बजरंग बलीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यंदा पूजेचा विशेष योगही असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Advertisement

हनुमान जन्मोत्सव शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार चैत्र महिन्याची पौर्णिमा आज (ता. 16) रात्री 2.24 वाजेपासून सुरू होईल आणि रविवार (ता. 17) दुपारी 12.23 वाजता समाप्त होईल. या दिवशी हस्त व चित्रा नक्षत्र असतील. हनुमान जन्मोत्सव पहाटे 5.56 ते 08.39 वाजेदरम्यान रवि योग असेल. रवि योगात देवाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

हनुमान जन्मोत्सव पूजा विधी
– हनुमान जन्मोत्सव दिवशी अनेक लोक उपवास करतात. भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. या दिवशी हनुमानाच्या – मूर्तीवर जानवं घातलं जातं. मूर्तीवर सिंदूर अर्पण केलं जातं.
– संध्याकाळी दक्षिणमुखी हनुमानाच्या मूर्तीसमोर हनुमान चमत्कारी मंत्रांचा जप फलदायी मानला जातो.

Advertisement

– रामचरितमानसातील हनुमान चालिसा आणि सुंदरकांड ग्रंथाचे पठण केले जाते.
– हनुमानजींची आरती करून पूजा विधी पूर्ण करा.
– पूजेत ‘ओम मंगलमूर्ती हनुमंते नमः’ या मंत्राचा जप करायला विसरू नका.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement