SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 15 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL: गुजरातने राजस्थान रॉयल्सला 155 धावांवर रोखून केला 37 धावांनी पराभव; हार्दिकच्या 87 रन्सच्या जोरावर गुजरातने जमवल्या होत्या 192 धावा

✒️ देशातील विद्युत प्रकल्पांत 35% कोळसा; महाराष्ट्रातही 1 ते 7 दिवसांचाच कोळसा, पण वीजमागणीत तब्बल 20 टक्क्यांहून अधिक वाढ

Advertisement

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवादी ठार, शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक; आर्मी व्हॅन उलटल्याने 3 जवानांचाही मृत्यू

✒️ भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार, ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचा दावा

Advertisement

✒️ एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीसाठी दिला प्रस्ताव, 54.20 डॉलर/शेअर प्रमाणे ट्विटरचे 100% शेअर्स 43.39 अब्ज डॉलरला खरेदी करण्याची दाखवली तयारी

✒️ मनसेला आणखी एक झटका; मनसे राज्य सचिव इरफान शेख यांचा राजीनामा, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर इरफान शेख यांनी व्यक्त केली होती नाराजी

Advertisement

✒️ देशात सुरू होणार फ्रॅक्शनल ट्रेडिंग, महाग शेअर्सच्या छोट्याशा भागाची खरेदी शक्य?; कंपनी कायदा समितीने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला केली शिफारस

✒️ शिर्डीत रामनवमी उत्सवात 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान शिर्डी संस्थानला प्राप्त, 3 दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी घेतलं साई दर्शन

Advertisement

✒️ पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची ईडीने केली 6 तास चौकशी, वाळू उत्खननाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहीती

✒️ Google ने iOS साठी ‘स्विच टू अँड्रॉइड ॲप’ केलं जारी, आयफोन वरून अँड्रॉईड डिव्हाइसवर डेटा सहजपणे ट्रान्सफर करण्यास होणार मदत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement