SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अटकपूर्व जामीन काय असतो? कधी होते अटक? वाचा काय सांगतो कायदा..

पोलीस ठाण्यात जेव्हा तक्रार दाखल होते तेव्हा त्याचा तपास करून प्राथमिक निष्कर्ष अहवाल म्हणजेच एफआयआरची नोंद केली जाते. त्यालाच गुन्हा दाखल होणे म्हणतात. खून किंवा खुनाचा प्रयत्न, मारामारी, बलात्कार, दंगल, लहान मुलांवर केलेला अत्याचार या अशा काही प्रकरणात थेट गुन्हा दाखल होऊ शकतो, मात्र इतर काही प्रकरणात पोलिसांच्या तपसानंतरच गुन्हा दाखल होऊ शकतो.

गुन्ह्याचे दखलपात्र (कॉग्निझेबल) व अदखलपात्र (नॅान कॅाग्निझबल) असे दोन प्रकार असतात. यामधील दखलपात्र गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) कलमे लावली जातात. या कलमानुसार लक्षात येतं की, ती जामीनपात्र आहेत की अजामीनपात्र आहेत.

Advertisement

जर गुन्हा जामीनपात्र असला तर काही प्रकरणात (अपघात वगैरे) पोलीस ठाण्यातच जामीन दिला जातो. पण कधी-कधी आपण असं ऐकतो की, काही वेळा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात हजर करूनही जामीन दिला जातो. पण अजामीनपात्र असल्यास आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले जाते आणि जर चौकशीत सहकार्य मिळाले नाही तर त्यासाठी त्या व्यक्तीला अटक होऊ शकते.

तपास अधिकाऱ्याला जर एखाद्या व्यक्तीने खून किंवा खुनाचा प्रयत्न, मारामारी, दंगल केली तर अशा ठराविक गुन्ह्यांमध्ये नोटीस न देता अटक करण्याचा अधिकार असतो. अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये न्यायालयात संशयिताला सादर करून कोठडी घ्यावी लागते. पण चौकशीला बोलवल्याच्या नंतर संबंधित संशयित व्यक्ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकते.

Advertisement

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज कधी करता येतो?

पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 41 (अ) नुसार चौकशीसाठी समन्स जारी केल्यावर वा गुन्हा दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर लगेचच संशयिताला अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेता येते. यावेळी सुनावणी होईपर्यंत संशयित व्यक्तीस अटक करू नये, असा दिलासा न्यायालय देऊ शकते. मग युक्तीवादानंतर अटीसापेक्ष अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून मंजूर केला जाऊ शकतो किंवा
सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यास आला तर (संशयित उच्च न्यायालयात दाद लागू शकतो.) संशयिताला पोलिस लगेच अटक करू शकतात.

Advertisement

अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाकडून अनेकदा बॉंड (जाचमुचलका) वा शुअरिटीचा (जामीनदार – अशी व्यक्ती की, जी संशयिताची जबाबदारी घेते आणि मग जामिनावर सुटका झाल्यानंतर संबंधित व्यक्ती फरार झाल्यास जामिनदार व्यक्ती जबाबदार असते.) उल्लेख केला जातो. म्हणजेच अटक झाल्यावर काही ठराविक रकमेच्या बॉण्डवर फक्त सही करावी लागते. अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना काही अटीसुद्धा संशयिताला पाळाव्या लागतात, नाहीतर ती रक्कम जप्त होऊ शकते. याचा परिणाम असा होईक की, त्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीनदेखील रद्द होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement