SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात ‘या’ तीन कार ठरल्या सर्वात सुरक्षित; टेस्टमध्ये मिळाले 5 स्टार

मुंबई :

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्यासाठी किती   सुरक्षित आहे? याची माहिती घ्या. बाजारात अशा अनेक सुरक्षित कार उपलब्ध आहेत. क्रॅश चाचणीनुसार मिळालेल्या सुरक्षा रेटिंगवर कोणती कार खरेदी करायची हे तुम्हाला ठरवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी ग्लोबल NCAP ने हे सुरक्षा रेटिंग जारी केले गेले आहे. आता भारतात कोणत्या 3 कार सर्वात सुरक्षित आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे.

Advertisement

Tata Altroz: या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, तर सध्या भारतात विक्रीसाठी असलेली ही सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये एकूण 49 पैकी 29.00 गुणांसह अल्ट्रोजला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकूण 17 पैकी 16.13 आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी 3 स्टार रेटिंग मिळाले. टाटा अल्ट्रोज​​च्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे त,र समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, हाय स्पीड वॉर्निंग अलार्म, रियर पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Mahindra XUV300: NCAP कडून सर्वेक्षण केलेल्या माहितीनुसार, Mahindra XUV300 ही रस्त्यावरील सर्वात सुरक्षित भारतीय कार आहे. ही कार 2014 पासून ग्लोबल एनसीएपी यादीत आपली जागा कायम केली आहे. या कारने वयोवृद्ध सुरक्षा सुविधेसाठी पाच आणि छोट्या सुरक्षा सुविधेसाठी चार स्टार मिळाले आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 300 च्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, हाय स्पीड अलार्म, पुढच्या सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Advertisement

Tata Nexon: टाटाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनला वयोवृद्धांच्या सुरक्षेसाठी चार आणि मुलांच्या संरक्षणासाठी तीन स्टार मिळाले आहेत. डिसेंबर 2018 नंतर तयार करण्यात आलेल्या या मॉडलने वयोवृद्ध संरक्षणासाठी 5 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 3 स्टार मिळवले आहे.  टाटा नेक्सनच्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, हिल होल्ड असिस्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Advertisement