SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वीज बिलाची कटकट कायमची मिटणार.., सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

सध्या कडक उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रचंड उकाड्यामुळे अंगातून घामाचा धारा लागत आहेत. घरातील कुलर, एसी नि फॅन सतत सुरु ठेवावे लागत आहेत. मात्र, महिन्याच्या अखेरीस हातात पडणारे वीजबिल पाहून काळजाचा ठोका चुकू शकतो..

दरम्यान, सध्या महाराष्ट्रासमोर विजेचा प्रश्न गंभीर झालाय. एकीकडे विजेची मागणी वाढलेली असतानाच, कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात 8 तासांचं लोडशेडींग सुरु केलंय.. एकीकडे वाढत्या विजबिलाचा आकडा नि दुसरीकडे लोडशेडिंग.. अशा कचाट्यात नागरिक सापडले आहेत.

Advertisement

विजेच्या या कटकटीतून तुम्ही कायमची सुटका करुन घेऊ शकता.. होय.. शासनाने अशी एक योजना सुरु केलीय, की तुम्हाला सरकारी विजेवर अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही. तुमची वीज तुम्हीच तयार करु शकता, ती वापरु शकता, एवढंच नव्हे तर सरकारला विकून पैसेही कमावू शकता.. चला तर मग या योजनेबाबत जाणून घेऊ या..

सरकारी योजनेबाबत..

Advertisement

केंद्र व राज्य सरकारने भारतात सौर ऊर्जेला (solar energy) चालना देण्यासाठी एक खास योजना सुरु केलीय. ‘सोलर रूफ टॉप योजना’ (Roof top solar power) असं या योजनेचं नाव.. देशात ‘रूफटॉप सोलर पॅनेल’च्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने ही योजना सुरु केली आहे..

घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जा निर्माण करता येते. त्यासाठी ‘ग्रिड-कनेक्टेड रुफटॉप सोलर स्कीम’ (फेज-II) लागू करण्यात आली आहे. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर रूफटॉप पॅनल बसवल्यास सरकारकडून 40 टक्के अनुदान, तर 10 किलोवॅट बसवल्यास 20 टक्के अनुदान मिळते.

Advertisement

राज्यांमध्ये स्थानिक वीज वितरण कंपन्या (Discoms) ही योजना राबवत आहेत. सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांत अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

योजनेचा फायदा

Advertisement
  • घरगुती वीज बिलात बचत होते. सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे 30 पैसे प्रति युनिटने महावितरणाला विकता येते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक प्राप्तीही करता येते.
  • घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • पारंपारिक ऊर्जा स्तोत्रांवरील ताण कमी होऊन सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
  • अंदाजे 25 वर्षे सोलर पॅनेलचा उपयोग करून वीजनिर्मिती करता येते.

योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://solarrooftop.gov.in/

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement