SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी नागपूर कनेक्शन उघड, ‘तो’ कर्मचारी अटकेत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ तर उडालीच परंतु याप्रकरणी या आंदोलनामधील कर्मचाऱ्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावले असल्याचा आरोप मविआ सरकारने केल्यानंतर आता नागपूर कनेक्शन उघड झालं आहे.

सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असता यामध्ये चप्पलफेक देखील झाली आणि या प्रकरणात नागपूरच्या एका व्यक्तीचाही संबंध होता आणि त्या व्यक्तीने त्या दिवशीही गुणरत्न सदावर्ते यांना व्हाट्सअप कॉल केला होता, असे पोलिसांच्याही तपासात समोर आले आहे. सध्या सदावर्ते आणि नागपूरच्या या व्यक्तीची चांगली चर्चा रंगली आहे.

Advertisement

नागपूरच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी केली अटक

दरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरूनच शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी (ST Workers) धडकल्याचा आरोप केला गेला आहे. त्यानुसार सदावर्ते यांना अटकही झाली आणि त्यानंतर हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही आता उघड झालं असून याप्रकरणी संदीप गोडबोले या कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

मुंबई पोलिसांनी बुधवारी नागपुरातील एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातील यांत्रिक कर्मचारी संदीप गोडबोले यास ताब्यात घेतलंय. अधिक माहीती अशी की, संदीप गोडबोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो एसटीमध्ये यांत्रिक पदावर नोकरी करत आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले हा सदावर्ते यांच्या संपर्कात होता, असा दावा केला जात आहे. गोडबोले याला चौकशीसाठी सध्या मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मुंबईत सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्यामध्ये नागपूरच्या व्यक्तीकडून व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनाच्या दिवशी नागपूरची एक व्यक्ती मुंबईत होती आणि आंदोलनाबाबत सर्व गोष्टी तो एकटा व्यक्ती हँडल करत होता. त्याने महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर उतरुन गटागटाने शरद पवारांच्या घराच्या ठिकाणी येण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. सिल्व्हर ओकजवळ असलेल्या गार्डनमध्ये जमा झाल्यावर नागपूरच्या व्यक्तीने स्वतःच माध्यमांना माहिती देऊन बोलावलं, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे. नागपुरातील आणखी काही एसटी कर्मचारी सदावर्तेच्या संपर्कात होते का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement