SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड लाँच, जाणून घ्या का आहे एवढं खास…

जगात सध्या अनेक देशांत क्रिप्टो करंसीचे वारे घुमू लागले आहे. आता तुमच्या कानावर आज नवीन गोष्ट पडणार आहे ती म्हणजे क्रिप्टो करंसीचे देखील क्रेडिट कार्ड आता लाँच करण्यात आले आहे. हे क्रिप्टो करन्सीचे क्रेडिट कार्ड नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. तुम्हाला-आम्हाला आधीच माहीत असलेले आणि जवजवळ सर्वसामान्याना ही उपयोगात येणारे सामान्य क्रेडिट कार्ड हे माहीतच आहे. चला जाणून घेऊ आता क्रिप्टो क्रेडिट कार्डबद्दल..

सध्या नुकतेच लाँच झालेले क्रिप्टोचे हे क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) जगात भलतेच चर्चेत आहे कारण हे जगातील क्रिप्टो करन्सीवर चालणारे पहिलेच क्रेडिट कार्ड आहे. बिटकॉईन, इथिरियम सारख्या आभासी चलनाद्वारे याचे व्यवहार पूर्ण होणार आहेत. महत्वाचं म्हणजे क्रिप्टो करन्सीवर काम करणारी कंपनी नेक्सो ने हे विशेष क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात दाखल केलं आहे. जगातील या पहिल्या क्रिप्टो क्रेडिट कार्डसाठी कंपनीने मास्टरकार्ड (MasterCard) सोबत हातमिळवणी केली आहे. Nexo ने सांगितले की हे कार्ड जगभरातील 92 दशलक्ष व्यापाऱ्यांकडे वापरली जाऊ शकतात, जिथे मास्टरकार्ड स्वीकारले जाते.

Advertisement

क्रिप्टो क्रेडिट कार्ड आभासी चलनाद्वारे व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी जास्त उपयोगी पडू शकते. म्हणून ते व्हर्च्युअल करंसीच्या जगतात धुमाकूळ घालत आहे. अशा अनेक फायद्यांसाठी क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आले आहे. रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेने क्रिप्टो करन्सीविषयी माहिती देताना म्हटलं की, नेक्सो आणि मास्टरकार्ड यांच्या हातमिळवणीमुळे क्रिप्टो व आर्थिक नेटवर्क सोबत काम करतील. या सहकार्य करारामुळे डिजिटल चलनाचे व्यवहार अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

कसे असेल क्रिप्टो क्रेडिट कार्ड

Advertisement

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे क्रेडिट कार्ड सध्या युरोपातील काही देशांमध्येच उपलब्ध असणार आहे. या क्रेडिट कार्डचा फायदा असा आहे की, हे कार्ड यूजर्सना क्रिप्टो करन्सी न खर्च खरेदी-विक्री व्यवहार करण्याची सुविधा देते. बिटकॉईन वा अन्य आभासी चलन या क्रेडिट कार्डची हमी म्हणून उपयोगात येतील. म्हणजे आभासी चलनाची हमी दिल्यास क्रेडिट कार्डचा उपयोग करण्यात येणार आहे. क्रिप्टो क्रेडिट कार्ड नेक्सो या कंपनीच्या क्रिप्टोसह जोडलेल्या पत मानांकनावर काम करेल.

अहवालानुसार, क्रिप्टो क्रेडिट कार्डची पत मर्यादा एक लाख रुपये असेल तर त्यावर 90 टक्के म्हणजे 90 हजारांची खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण होऊ शकतील. सध्या हे कार्ड काही यूरोपीय देशांमध्ये उपलब्ध होणार असल्याने तिथल्या चलनातच याचे व्यवहार पूर्ण होतील. हे पेमेंट-कार्ड सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे काम करेल. या कार्डसाठी कमीत कमी खर्च मर्यादा, मासिक शुल्क तसेच इतर कडक अटी नाहीत. या कार्डवर ठराविक खर्च करण्याला व रक्कम काढण्याला प्रतिबंध नाही. ग्राहकाने कार्डचे जेवढे क्रेडिट लिमिट वापरले असेल, तेवढ्यावरच ग्राहकाला व्याज द्यावे लागेल. ज्या ग्राहकांचा लोन-टू-व्हॅल्यू रेशो 20 टक्के अथवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना या क्रेडिट कार्डवर शुन्य व्याज लागेल. सध्याचे युग हे डिजिटल चलनाचे आहे. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिट कार्डचे संकल्पना नाकारण्यात येऊ शकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement