SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, चालक जखमी, पण..

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कारला अपघात (Indurikar Maharaj Accident News) झाला असल्याची बातमी समोर आली आहे. राज्यभरात आपल्या कीर्तनांनी प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातातून ते थोडक्यात बचावले असल्याची माहीती आहे.

इंदोरीकर महाराज हे स्कॉर्पिओतून परतूर शहरात रात्री जात असताना हा अपघात झाला. लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरला इंदुरीकर महाराज यांच्या कारची धडक झाली. या अपघातात इंदुरीकर महाराज सुखरुप बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या जवळपास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी निघाले असता परतूर शहरातील साईनाथ कॉर्नर जवळ रस्ता क्रॉस करताना ट्रॅक्टरने महाराजांच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक दिली. स्थानिकांच्या माहीतीनुसार, इंदुरीकर महाराजांच्या गाडीवर असणाऱ्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

ट्रॅक्टरचालक आणि इंदुरीकरांचा वाहन चालक अशा दोघांनीही एकाच वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या अपघातात गाडीचे चालक संजय गायकवाड (वय 40) हे जखमी झाले असून, जखमी झालेले चालक गायकवाड यांस परतूर येथील डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. महाराजांसह इतर सहकार्‍यांना कोणतीही इजा झाली नाही. वाहनाचे मात्र बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

Advertisement

आपल्या हसऱ्या स्वभावामुळे, विनोदी आणि मार्मिक शब्दफेकीमुळे इंदुरीकर महाराज राज्यात प्रसिद्ध आहेत. जीवनाच्या प्रवासात तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना ते आपल्या कीर्तन, प्रवचनातून मार्गदर्शन करतात, ते डोळ्यात अंजन घालणारे असतं. राज्यातच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली नाही तर देशाबाहेर देखील त्यांचा नावलौकिक आहे. या घटनेने राज्यभरात चर्चा होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement