SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणामुळे साजरा होतो ‘गुड फ्रायडे’.. या दिवसाचं महत्व नि परंपरा जाणून घ्या..!

आज ‘गुड फ्रायडे’.. ‘बायबल’नुसार, येशूंनी बलिदान दिलं, तो दिवस होता, शुक्रवार.. त्यामुळे हा दिवस ‘गुड फ्रायडे’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केलं जातं.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो.. मात्र, या दिवशी कोणत्याही चर्चमध्ये ‘घंटानाद’ केला जात नाही. लाकडी काठीने केवळ छोटा आवाज केला जातो. ‘गुड फ्रायडे’ची परंपरा काय, जगभर हा दिवस कसा साजरा होतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘गुड फ्रायडे’चं महत्व
‘गुड फ्रायडे’ला ‘होली फ्रायडे’ किंवा ‘ब्लॅक फ्रायडे’ असंही म्हणतात. या दिवशी काळे कपडे घालून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. आपल्या गुन्ह्यांची माफी येशूकडे मागितली जाते. येशू समाजाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी क्रॉसवर चढला. त्यातून समाजासाठी, मानवतेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याने या दिवसाला ‘गुड फ्रायडे’ म्हटलं जातं.

जगभर कसा साजरा होतो..?
‘व्हॅटिकन सिटी’ व ‘रोम’मध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. चर्चमध्ये येशूच्या बलिदानाविषयी सांगितले जातं. ‘रोमन कॅथलिक’ या दिवशी उपवास करतात. बर्मुडा येथे पतंग उडवून हा दिवस साजरा केला जातो. कारण, पतंगातील लाकडी काठ्या हे क्रॉसचे प्रतीक मानले जाते.

Advertisement

या दिवशी प्रसाद म्हणून ‘गोड चपात्या’ खाण्याची परंपरा आहे. ब्रिटनमध्ये या दिवशी ‘घोडेस्वारी’ बंद असते. लंडनमध्ये येशूच्या जीवनावर 90 मिनिटांची एक नाटिका सादर केली जाते. ती पाहण्यासाठी लाखो नागरिक लंडनमध्ये जमतात, असे सांगण्यात आलं..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement