SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेन्नई सुपर किंग्जचे 14 कोटी बुडाले; ‘हा’ खेळाडू झाला टीमबाहेर

मुंबई :

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. यातच चेन्नईच्या संघाला अडचणीत आणखी भर घालणारी माहिती समोर आलीय. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे आयपीएल 2022 बाहेर झाल्याचं वृत्त प्रसार माध्यमांत झळकत आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक चहर क्रिकेट मैदानातून चार महिन्यांसाठी बाहेर झाला आहे. याचा अर्थ दीपक आयपीएलच्या 15व्या हंगामात एकही मॅच खेळणार नाही. हा चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जातोय. पण त्याचसोबत टीम इंडियासाठी देखील मोठा शॉक आहे. कारण ऑस्ट्रेलियात या वर्षाच्या अखेरीस टी-20 वर्ल्डकप आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेलाही दीपक मुकण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्सने या वर्षी दीपक चाहरला 14 कोटींना खरेदी केले होते. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला अपेक्षा होती की दीपक चाहर फिट होऊन पुन्हा आयपीएलमध्ये परतेल मात्र आता असे कठीण दिसत आहे. दीपक चाहर यावेळेस बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे आणि आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार दीपक चाहरला त्याची जुनी समस्या पुन्हा सतावतेय.

Advertisement

चेन्नईसाठी दीपकचे संघात नसने हा मोठा शॉक आहे. या वर्षी मेगा लिलावात चेन्नईने दीपकसाठी 14 कोटी रुपयांची बोली लावली होती. आयपीएलच्या इतिहासाता एखाद्या जलद गोलंदाजाला इतकी बोली लावण्याची ही पहिलीच घटना होती.

Advertisement