SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुष्काळात तेरावा महिना; आता ‘या’ सरकारी निर्णयामुळे आणखी वाढणार गाड्यांच्या किमती

मुंबई :

ऑटो सेक्टरमध्ये देशांतर्गत वाढती महागाई, रोज वाढणारे इंधन-धातूचे दर तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून आला आहे. आयात-निर्यात होणाऱ्या गोष्टीत ऑटो सेक्टरचा मोठा वाटा आहे. आणि त्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी आणि इतर कही कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. आता सरकारने अजून एक मोठा झटका दिल्याने किमती अजूनच वाढणार आहेत.

Advertisement

सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता प्रवासी कारमध्ये 6 एअरबॅग्ज (Car Airbags) अनिवार्य झालेल्या आहेत. आणि आता या निर्णयाने वाहनांच्या निर्मितीत खर्च वाढेल. त्यामुळे आपोआपच कार अधिक महाग होतील, असं मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) अध्यक्ष आरसी भार्गव यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे आधीच वाहनांच्या किमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर यामुळे अधिक दबाव येईल.

देशात तयार होणाऱ्या सर्व कारमध्ये ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर एअरबॅग देणे आधीच बंधनकारक आहे. आता नव्या सरकारी धोरणानुसार आणखी चार एअरबॅग जोडणे, बंधनकारक आहे. त्यामुळे नव्या चार एअरबॅग जोडल्यास गाडीची किंमत अंदाजे 17,600 रुपयांनी वाढेल. आता दिवसेंदिवस इंधन महाग, वाहने महाग अशी परिस्थिती असताना लोकांनी आता सायकल वापरायला काढायच्या का?, अशी चर्चा लोकांमध्ये मजेने का होईना पण चालू आहे.

Advertisement