SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगात भारी ऑफर: ‘त्या’ स्मार्टफोनच्या पहिल्याच सेलमध्ये मिळतोय 5 हजारांचा डिस्काउंट आणि 4,999 रुपयांचे स्मार्टवॉच फ्री

मुंबई :

Realme GT 2 Pro स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. कंपनीने हा फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये जानेवारीमध्ये आणि युरोपमध्ये फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. Realme 9 4G हँडसेट लॉन्च देखील Realme GT 2 Pro सह लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन आपल्याला पहिल्याच सेलमध्ये चक्क 5 हजारांच्या डिस्काउंटसह मिळणार आहे.

Advertisement

हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी करू शकता. ज्यात आपल्याला 5 हजारांच्या डिस्काउंटसह 4,999 रुपये किमतीची Realme Watch S देखील मोफत देणार आहे. या सवलतीसाठी, HDFC किंवा SBI कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

Realme GT 2 Pro मध्ये 1440×3216 पिक्सेल रिझोल्यूशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह 6.7-इंचाचा LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये पेपर टेक मास्टर डिझाइन देण्यात आले आहे. फोन पंच-होल कॅमेरा कटआउटसह येतो आणि फोनची सर्वोच्च ब्राइटनेस 1,400 nits आहे. स्मार्टफोनचे LTPO AMOLED पॅनल 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश दर मिळजो. ज्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटमध्ये स्विच करण्यास मदत करते. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर Realme GT 2 Pro मध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित UI 3.0 वर काम करतो.

Advertisement

यात 50-मेगापिक्सलचा ओआयएस प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मायक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे.  हा फोन 5000 mAh बॅटरीने समर्थित आहे. ही बॅटरी 65 W सुपर डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Advertisement