SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : ‘त्या’वरून राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता; मविआच्या 2 मंत्र्यांवरही झाला होता असाच गुन्हा दाखल

मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची काल ठाण्यात सभा झाली. कालच्या या उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. भाषणाच्या सुरुवातीलाच ‘माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे तपास यंत्रणांना कळाले पण  एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी जाणार  हे त्यांना माहित नव्हतं’, अशी टीका केली. मात्र भाषण सुरु होण्यापूर्वी राज यांनी एक अशी गोष्ट केली, ज्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज यांना तलवार भेट दिली. यानंतर राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

याशिवाय राज ठाकरे यांच्या भाषणात एखादे आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास त्यावरूनही राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही यापूर्वी मुंबई पोलिसांनी असाच गुन्हा नोंदविला होता.

Advertisement

दरम्यान ‘मी व्यासपीठावर येताना मला अग्निशमन दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काय आग नाही लावणार’, अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

Advertisement