SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: अखेर ‘असा’ फुटला महागाईचा बॉम्ब; आता प्रवाशांचा खिसा होणार खाली

मुंबई :

देशभरातील महागाई सध्या दिवसेंदिवस वाढतंच चालली असून यामुळे सर्वसामान्यांना फटका बसताना दिसत आहे. पेट्रोल डीझेलसहीत बाकींच्या वस्तूंनाही महागाईच्या झळा बसताना आपल्याला पहायला मिळत आहेत. देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय. गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आणि महागाईचा दर किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्क्यांवर पोहोचलाय. आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

अॅपआधारित टॅक्सी सेवा पुरवठादार असलेल्या ओला आणि उबर या दोन कंपन्यांनी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका दिला आहे. सीएनजी दरवाढीनंतर ओला आणि उबर या कंपन्यांनी प्रमुख शहरांत १० ते १५ टक्के भाडेवाढ केली आहे. मुंबईत उबरने १५ टक्के दरवाढ केली आहे. ओला-उबरच्या दरवाढीने मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

एवढेच नाही तर मार्चमध्ये खाद्य महागाई ७.६८ टक्के नोंदवली गेलीय. तर महिनाभरात भाज्यांचे भाव ४ टक्क्यांनी वाढलेत. गेले काही महिने महागाई वाढतच आहे आणि मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आणखी वाढली आहे. भारतात सुमारे 87 टक्के कुटुंबे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असल्याचे एका लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात सांगितले.

Advertisement

दरम्यान ओला प्राईम सेवेच्या भाड्यात हैदराबाद शहरात १६ टक्के वाढ झाली असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनात आले आहे. पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी दरवाढीने टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली. नुकताच ओला आणि उबरच्या कॅब चालकांनी भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

Advertisement