SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलआयसीचा आयपीओ ‘या’ तारखेला होणार लॉंच, गुंतवणूकदार करणार रग्गड कमाई..

शेअर बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. आता यामध्ये आणखी भर टाकण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आयपीओची (IPO) वाट गुंतवणूकदार पाहत आहे. देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) अनेक दिवसांपासून चर्चा असून आता एलायसीचा आयपीओ लवकरच लॉंच होऊ शकतो.

प्राप्त माहितीनुसार, एलआयसी (LIC) चा आयपीओ 25 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत बाजारात येऊ शकतो. सोबतच एलआयसी आज 13 एप्रिल रोजी सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्याकडे आपला UDRHP (अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल करू शकते.

Advertisement

केंद्र सरकार मार्च महिन्यामध्ये LIC IPO आणणार होते, पण आपल्याला माहीतच आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील अनेक बाजारपेठेवर परिणाम झाला तसाच परिणाम आपल्या शेअर बाजारावर झाला होता. त्यामुळे हा आयपीओ लॉंच होण्यास अधिक वेळ लागला आणि हा आयपीओ पुढे ढकलण्यात आला. आता शेअर बाजाराची स्थिती पूर्वीसारखीच होताना दिसतेय. अशा परिस्थितीत सरकार लवकरच एलआयसीचा आयपीओ आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एलआयसी आपल्या आयपीओद्वारे विमा कंपनीतील आपला 5 ते 6.5 टक्के हिस्सा विकू शकते. एलआयसी आयपीओद्वारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. महत्वाचं म्हणजे एलआयसी कंपनीचा हा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.

Advertisement

सेबीला सादर केलेल्या दस्तऐवजानुसार, एलायसीने पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के इश्यू राखून ठेवले आहेत., याची घोषणा कंपनीने याआधीच केलीय. म्हणजेच तुमची एलआयसी पॉलिसी संपली असली तरीही तुम्ही राखीव कोट्यात बोली लावू शकणार आहात. याशिवाय 5 टक्के हिस्सा एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल.

अजूनपर्यंत बाजार नियामक सेबीने एलआयसीसह इतर 43 कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. याशिवाय इतर 54 कंपन्याना मंजुरी देण्याची बाकी असल्याचे बोलले जात आहे. आता या चालू आर्थिक वर्षात तब्बल 97 कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 2.25 लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करू शकतात. त्यामुळे यंदा चांगलाच धमाका होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement