SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! ‘या’ भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षण लागू, राज्य शासनाचा निर्णय जारी..

महाराष्ट्रातील मविआ म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण विधेयक 2021) एकमताने संमत केले असता आता शासन निर्णयही जारी झाला आहे. लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती मिळत आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती करताना, 9 जुलै 2019 रोजी केंद्र सरकारने लागू केलेल्या Reservation in Teacher’s Cadre Act, 2019 कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारने संवर्गनिहाय आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच प्राध्यापक पदभरतीचा अध्यादेश काढून भरती प्रक्रिया लवकर करावी, अशी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने मागणी केली होती.

Advertisement

राज्य सरकारने (State Government) संवर्गनिहाय आरक्षण (Reservation) कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे अनेक ठिकाणी झालेल्या उपोषणात मागणी झाली होती. संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती पण अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती. आता विद्यापीठ व महाविद्यालयास एकक मानून संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने 11 एप्रिल 2022 रोजी शासन निर्णय जारी केला असल्याची माहीती आहे.

राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त उमेदवारांसाठी राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू झाले आहे. केंद्र सरकारने हा कायदा आधीच लागू केला होता पण राज्यातील महाआघाडी सरकारला बराच कालावधी लागला, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारचे कान टोचले आहे.

Advertisement

पडळकरांनी ट्विट करून दिली माहीती..

“विधी मंडळात जेव्हा याचे विधेयक मांडले त्यावर आम्ही मा. @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठींबा दिला. एकमतानं हे विधेयक पारित झाले. महामहिम राज्यपालांची मी 18 जानेवारीला भेट घेतली. या विधेयकावर सही करून आपण ओबीसींना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या कायद्यामुळे आगामी प्राध्यापक भरतीमध्ये ओबीसींना न्याय मिळेल, अशी अपेक्षा करू”, असे पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement