SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : मुंडेंना हृदयविकाराचा झटका नाहीच; अजित पवारांनी सांगितली खरी गोष्ट

मुंबई :

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. प्रकृती अस्वस्थ जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Advertisement

मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच बहिण पंकजा आणि खासदार प्रीतम मुंडे या भावाच्या भेटीला गेल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

‘धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण झटका वैगेरे नाही. डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Advertisement

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘काल पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे असताना त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. त्यामुळे ते काही काळासाठी बेशुद्ध झाले होते. इथे आणलं तेव्हाही त्यांना शुद्ध नव्हती. एमआरआय वैगेरे झाल्यावर त्यांना शुद्ध आली’.

Advertisement