SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ज्या’ मंत्र्यांवर केली टीका, त्यांचेच पुत्र राज ठाकरेंच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

मुंबई :

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं होतं. त्यानंतर काल झालेल्या उत्तरसभेतही राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ यांना टार्गेट केले.

Advertisement

‘भुजबळ यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळं भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीज वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारे भुजबळ पहिले नेते होते’, अशी जोरदार टीका राज यांनी केली होती. या टीकेने महाविकास आघाडीच्या व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

छगन भुजबळ (chaggan Bhujbal) यांचे पुत्र पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहचले आहेत. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात आणि विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. पंकज भुजबळ यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील शिवतीर्थावर पोहोचले आहेत. गुढीपाडव्याच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.

Advertisement

आता या सगळ्याच भेटींचे वेगवेगळे अर्थ काढले जात असताना पंकज भुजबळ यांच्या ‘राज’ भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement