SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, ‘या’ प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई..!

महाराष्ट्राच्या राजकारणातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात ‘आर्म्स अ‍ॅक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अविनाश जाधव व रवींद्र मोरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या वतीने मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित करतानाच, सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ऐन उन्हाळ्यात चांगलंच तापल्याचे दिसत आहे..

Advertisement

कशामुळे गुन्हा दाखल..?

मनसेच्या या सभेत राज ठाकरे यांचे भाषण होण्यापूर्वी ठाण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना तलवार भेट देऊन सत्कार केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनीही भेट दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत उंचावली होती. याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरुन ‘आर्म ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Advertisement

याबाबत नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ म्हणाले, की “नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 12 एप्रिलला गडकरी चौकात मनसेच्या जाहीर सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली.”

“आर्म अ‍ॅक्टनुसार राज ठाकरे यांच्यासह मनसेचे ठाणे व पालघरचे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे ते म्हणाले. तसेच ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलले, याचीही तपासणी केली जाणार असल्याचे समजते.

Advertisement

‘या’ नेत्यांवरही असाच गुन्हा.. 

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात तलवार उंचावल्याप्रकरणी याआधीही भाजपचे मोहित कंबोज, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राज ठाकरे यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement