SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ 5 राज्यांना कोरोना अलर्ट; वाचा, 2 वाईट आणि 1 चांगली बातमी

नवी दिल्ली :

आताच लहान मुले बिनधास्त शाळेत जाऊ लागली होती. अशातच कोरोनाची टांगती तलवार पुन्हा डोक्यावर आल्याची भीती सतावत आहे. एका आठवड्यात गुजरातमध्ये 89%, हरियाणामध्ये 50% आणि दिल्लीत 26% कोरोना रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये एका व्यक्तीला XE व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल लागली आहे.

Advertisement

चीन आणि अमेरिकेत कोविडची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांना इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम सरकारांना पत्र लिहिले आहे. राज्यांना सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याच्या कारणांचा गांभीर्याने तपास करण्यास सांगितले आहे.

2 वाईट बातम्या :-

Advertisement

एक आठवडा आधी दिल्लीत कोविड पॉजिटिविटी रेट 1% पेक्षा कमी होतं आणि आता 2.7% झाला आहे.

हरियानात मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत 50% वाढ झाली आहे.

Advertisement

1 चांगली बातमी :- तज्ञ मंडळींच्या म्हणण्यानुसार आता कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. त्यामुळे कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता कमी आहे. सध्या भारताला XE व्हेरिएंटपासून जास्त धोका नाही, कारण हा ओमायक्रॉनशी संबंधित सब-व्हेरिएंट आहे, ज्याची लाट नुकतीच ज्या देशातून गेली आहे आणि ज्यामुळे देशातील जवळपास 50-60% लोक संक्रमित झाले होते.

Advertisement