SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 13 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 13 एप्रिल 2022

✒️ IPL: उथप्पा-दुबेची आक्रमक खेळी, थिक्षणाचे 4 बळी, चेन्नई सुपरकिंग्जचा 23 धावांनी विजय; 217 धावांचे लक्ष्य गाठण्यास बँगलोर अपयशी
✒️ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेते, कार्यकर्त्यांची रुग्णालयात धाव
✒️ मुंबईतील सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात PNG साडेचार रुपयांनी महागणार, नवीन दर आजपासून लागू


✒️ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज
✒️ किरकोळ महागाई दर गेल्या मार्चमध्ये 6.95 टक्क्यांच्या पातळीवर, औद्योगिक उत्पादनात 1.7 टक्के वाढ
✒️ मुंबै बँक घोटाळा प्रकरण: बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Advertisement✒️ कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत 60.09 % मतदान, चुरशीच्या लढतीत दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा, महाविकास आघाडी व भाजप उमेदवारात थेट लढत रंगली
✒️ देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये हाेणार; यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी आहे चर्चेत
✒️ पीएनबी घोटाळ्यातील गुन्हेगार नीरव मोदीचा निकटवर्तीय सुभाष शंकरला सीबीआयकडून अटक, सीबीआय न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची सीबीआय कोठडी
✒️ Hyundai Creta SUV, Hyundai i20 कार्सला 3-स्टार रेटिंग, टोयोटाच्या अर्बन क्रूझरला 4-स्टार रेटिंग – ग्लोबल NCAP ची क्रॅश टेस्ट


➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement