SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून ‘त्या’ 2 जिल्ह्यांना नाही बसणार लोडशेडिंगचा फटका; नितीन राऊतांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई :

विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारी महावितरणने दिला आहे. रोज सुमारे ३ हजार मेगावॉट विजेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

Advertisement

ग्रामीण आणि शहरी भागात किती वेळ लोडशेडिंग असेल, याविषयी आधीच राज्य सरकारने स्पष्टता दिलेली आहे. मात्र आता 2 जिल्ह्यांना आणि प्रामुख्याने तेथील शहरांना लोडशेडींगचा कमी फटका बसणार आहे. ‘शहरी भागात कमी लोडशेडिंग असेल, असं स्पष्ट करत पैसे भरले तर वीज विकत घेता येईल. म्हणून पुणे मुंबई सुटलंय’, अशी स्पष्ट माहिती स्वत: ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्याला इतर शहरांच्या तुलनेने लोडशेडिंगचा कमी त्रास सहन करावा लागणार आहे.

जिथं लॉस जास्त आहे. चोरी आहे, तिथंच लोडशेडिंग आहे असं म्हणत लोडशेडिंगची नियमावली देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. पैशांचे सोंग घेता येणार नाही, लोकांनी वीज बिल भरावं ही विनंती आहे, असं आवाहन नितीन राऊतांनी नागरिकांना केलं आहे.

Advertisement

‘महावितरण’ला सध्या २५०० ते ३००० मेगावॉट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. हे टाळण्यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

Advertisement