SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून भारतात आयफोनची किंमत होऊ शकते कमी; ‘ती’ गोष्ट आली कामी

मुंबई :

2020 मध्ये आयफोन भारतात बनवला जाणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. मग पुढे मेक इन इंडिया या अभियानामार्फत जगप्रसिद्ध अॅपल (Apple Inc) कंपनीनं चेन्नईतील फॉक्सकॉन प्रकल्पात (Foxcon Plant) आपल्या महत्वाच्या आयफोन 13 च्या चाचणी उत्पादनाला सुरुवात केली. आणि आता अ‍ॅपलचा लेटेस्ट आयफोन ‘मेड इन इंडिया’ असेल.

Advertisement

अशा भारतातच निर्मिती झाली असल्याने त्याच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अ‍ॅपलच्या या फोन निर्मितीच्या खर्चात कपात होऊ शकते. अ‍ॅपलचे प्लांट तामिळनाडू आणि कर्नाटकात आहेत. दुसरीकडे, तैवानची पेगाट्रॉन देखील या महिन्यात भारतात आयफोन 12 चे उत्पादन सुरू करू शकते.

जर आयफोनच्या किमतीत बदल झाला तर भारतात आयफोनचा खप अजून वाढू शकतो, असे अंदाजही सांगितले जात आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित अॅपल कंपनीनं आपल्या जवळपास सर्वच टॉपच्या स्मार्टफोन्सची निर्मिती ही अमेरिकेतील प्रकल्पातच केली होती. पण कंपनीनं सर्वात टॉप स्मार्टफोन मॉडेल iPhone13ची निर्मिती भारतात करण्याचा निर्णय घेतला 2021 मध्येच घेतला होता.

Advertisement

देशांतर्गत स्मार्टफोन उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनसह 16 कंपन्यांना 2020 मध्ये सरकारने मंजूरी दिली आहे. या तिन्ही कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत भारतात एकूण सुमारे 6,800 कोटी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

Advertisement