SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदा पाऊस शेतकऱ्यांना हसवणार की रडवणार..? ‘माॅन्सून’बाबत ‘स्कायमेट’चा अंदाज जाहीर..!

सध्या शेतातील उन्हाळी कामात शेतकरी व्यस्त असला, तरी त्याचे सारे लक्ष सतत आकाशाकडे लागलेले असते.. भारतीय शेतकऱ्याच्या साऱ्या आशा ‘माॅन्सून’वर लागलेल्या असतात. ‘माॅन्सून’ने साथ दिली, तर पदरात काही तरी माप पडतं.. नाहीतर शेतकऱ्याच्या नशिबी पूर्ण वर्षभर ससेहोलपट ठरलेलीच..!

साधारण जूनच्या सुरुवातीला भारतात ‘माॅन्सून’चं (Monsoon) आगमन होतं. हिंदी महासागर व अरबी समुद्रातून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर ‘माॅन्सून’ अवलंबून असतो. संपूर्ण दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर दरम्यान हे वारे सक्रिय असते. या वाऱ्यांचा अभ्यास करून सरकारी आणि विविध खासगी कंपन्या ‘माॅन्सून’बाबत अंदाज व्यक्त करीत असतात.

Advertisement

सध्या चटके देणाऱ्या उन्हाने सारे हैराण झालेले असताना, हवामान अंदाज वर्तवणाऱ्या ‘स्कायमेट’ (Skymet Monsoon) या खासगी संस्थेने शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’ दिलीय. ती म्हणजे, यंदाचा ‘माॅन्सून’ सरासरीइतका, म्हणजेच सर्वसाधारण असेल..

Advertisement

जूनच्या सुरुवातीला ‘माॅन्सून’ची सुरुवात चांगली होईल. देशात सरासरीच्या 98 टक्के पावसाचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. यंदाच्या मोसमी पावसाचे हे दुसरे पुर्वानुमान आहे. दुसऱ्या वेळीही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार भारतात यंदा सरासरी 98 टक्के (+/- 5 टक्के ‘इरर मार्जिन’सह) पावसाची शक्यता आहे. याचाच अर्थ आपल्याकडे माॅन्सून ‘सामान्य’ राहू शकतो.. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 880.6 मिली मीटर पावसाची शक्यता आहे.

Advertisement

‘स्कायमेट’ने 21 फेब्रुवारी 2022 रोजी पहिल्यांदा पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. आपल्या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत, ‘स्कायमेट’ने यावर्षी ‘माॅन्सून’ सामान्य राहणार असल्याचं म्हटलंय. यंदा एकूण 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता असल्याचं ‘स्कायमेट’ने आपल्या वेबसाईटवर जाहीर केलंय..

कोणत्या महिन्यात किती पाऊस..?

Advertisement
  • जून- 107 टक्के (सरासरी पाऊस 166.9 मिमी)
  • जुलै- 100 टक्के (सरासरी पाऊस 285.3 मिमी)
  • ऑगस्टमध्ये 95 टक्के (सरासरी पाऊस 258.2 मिमी)
  • सप्टेंबरमध्ये 90 टक्के (सरासरी पाऊस 170.2 मिमी)

दरम्यान, राजस्थान, गुजरात व ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आदी राज्यांमध्ये यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ व उत्तर कर्नाटकमध्ये जुलै व ऑगस्टमध्ये कमी पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारत, महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्य क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल.

मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील. यंदाचा माॅन्सून शेतीसाठी चांगला असेल. कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement