SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

RBI ची महाराष्ट्रातील ‘या’ 3 प्रसिद्ध बँकांवर मोठी कारवाई; बघा, नेमकं काय आहे प्रकरण

आरबीआयच्या नियमांचं पालन न केल्यानं देशातील चार सहकारी बॅंकांना याची किंमत मोजावी लागली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना 4 लाखांचा दंड सुनावला आहे. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील तीन तर मध्यप्रदेशातील एका बँकेचा समावेश आहे. दरम्यान यापूर्वी 5 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेनही अनेक बँकांना दंड ठोठावला होता.

जाणून घ्या त्या 4 बँका कोणत्या :- 

Advertisement
  • नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  • लातूरमधील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  • नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक
  • मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत

रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना नियमांचं पालन न केल्याबद्दल एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेनं जारी केलेल्या चार स्वतंत्र स्टेटमेंटनुसार, हा दंड नियमांकडे दुर्लक्ष करत पालन न केल्यामुळं लावण्यात आला आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेले व्यवहार किंवा करार यांच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा यातून कोणताही हेतू नाही, असं आरबीआयच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

बॅंकनिहाय दंडाची रक्कम :- 

Advertisement
  • अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपये
  • महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड
  • नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 50,000 रुपयांचा दंड
  • जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला एक लाख रुपयांचा दंड