SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘नॉट रिचेबल’ सोमय्यांबाबत गृहमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य, संजय राऊतांनी केला वेगळाच दावा..!

गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.. काही दिवसांपूर्वी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सोमय्या यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले..

दरम्यान, ‘आयएनएस’ विक्रांत निधी संकलनात गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सोमय्या यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे किरीट सोमय्या व त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे..

Advertisement

केंद्राकडे विचारणा करु
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या अचानक गायब झाले आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, की “किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने ‘झेड’ दर्जाची सुरक्षा दिलीय. त्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याबाबत आम्ही केंद्राकडेच विचारणा करणार आहोत..”

“दुसऱ्यांवर आरोप करायचे नि स्वत:वर आरोप झाले की, चौकशीला सामोरे जायचे नाही, हे काही शूरपणाचे लक्षण नाही..” असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.

Advertisement

दरम्यान, सोमय्या यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेगळाच दावा केलाय. ते म्हणाले, की “सोमय्या पिता-पूत्र हे गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच लपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात, ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात..” असंही राऊत म्हणाले.

सदावर्ते यांच्याविषयी काय म्हणाले..?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत. याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, की “शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची रीतसर चौकशी सुरू आहे. पोलिसांना जी माहिती मिळत आहे, ती माहिती पोलिस न्यायालयात देत आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने जास्त माहिती उघड करणं योग्य नाही. मात्र, गुप्तचर यंत्रणेनं पत्र लिहून हल्ल्याची कल्पना दिलेली असतानाही, योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे..!”

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement