SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सकाळी लवकर उठण्याचे मोठे फायदे, आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम..!

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे..’ हे वाक्य नेहमीच कानावर पडतं… लवकर झोपून लवकर उठण्याची सवय असणारी लोक जीवनात सुखी, बुद्धीवान, श्रीमंत नि निरोगी असतात. अनेक यशस्वी आणि श्रीमंत माणसांच्या यशाचे गुपित लवकर उठण्याच्या सवयीत दडलेलं आहे.

जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. मात्र, लवकर उठण्यासाठी तुम्हाला आधी वेळेवर झोपण्याची सवय स्वतःला लावावी लागेल. कारण, कमीत कमी सात ते आठ तास झोप मिळणंही शरीरासाठी गरजेचं असतं.

Advertisement

सकाळी लवकर उठण्याचे फायदे
उत्साही वाटतं – सकाळी लवकर उठल्यास उत्साही वाटतं.. असे लोक कार्यक्षम असतात. दिवसाची सुरूवात ‘ब्रह्म’ मुहुर्तावर करणाऱ्या लोकांची बुद्धी अतिशय तल्लख आणि तेजस्वी असते. ‘ब्रह्म’ मुहुर्त म्हणजे रात्रीचा चौथा प्रहर आणि सुर्योदया आधीचा पहिला प्रहर.

एखाद्या गोष्टीचा अभ्यास, प्रार्थना, चिंतन, मनन, ध्यान करण्यासाठी सकाळची वेळ फायदेशीर ठरते. वास्तविक माणसाचे शरीर चक्र हे सुर्यानुसार चालते. त्यामुळे सकाळी उठल्यामुळे निसर्ग नियमानुसार तुम्हाला फ्रेश वाटते.

Advertisement

आनंद मिळतो – उत्साही आणि सशक्त असणारी माणसे नेहमीच आनंदी राहतात. त्यामुळेच सकाळी लवकर उठल्यास तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते. सकाळी लवकर उठल्याने तुमची कामे वेळत पूर्ण होतात. त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो.

सकारात्मक विचार- सकाळची वेळ अतिशय शांत असते. त्यामुळे प्रसन्न वाटते. मन प्रसन्न असल्यास त्याचा परिणाम तुमच्या विचारसरणीवर होतो. मनात चांगले विचार येतात. याउलट उशीरा उठल्याने कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड वाढते, कंटाळा येतो.

Advertisement

व्यायामासाठी वेळ – दिवसभर कामाचा ताण असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारा व्यायाम करता येत नाही. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यास दिवसभर शरीर उर्जादायी राहते.

ताण-तणावातून मुक्ती – सकाळी लवकर उठल्याने कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे तुम्हाला कामाचं टेंन्शन येत नाही. कामे वेळेत झाल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकता. त्यामुळे ताण-तणावापासून दूर राहता येते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement