SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून उन्हाळी सुटी मिळणार, निकालाबाबतही झाला निर्णय..

राज्यातील विध्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर (Good news for students of maharashtra) दिली आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व सन 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जाहीर करत माहीती दिली आहे.

राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे. पुढील महिन्यातील 2 मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) लागू होणार आहे, अशी माहीती राज्य सरकारने दिली आहे.

Advertisement

तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्याचा दुसरा सोमवार दि. 13 जून 2022 पासून होणार आहे तर उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा चौथ्या सोमवारी 27 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच शाळा सुरू होण्याच्या दिवशी जर सार्वजनिक सुट्टी असेल तर यादिवशी शाळा न उघडता त्या पुढील दिवशी उघडता येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली.

निकाल केव्हा लागणार…?

Advertisement

राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावी इयत्तांचा निकाल 30 एप्रिल 2022 पर्यंत किंवा त्यानंतरच्या सुटीच्या वेळेत लावता येऊ शकतो. मात्र हा निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असणार आहे, असं परिपत्रकात म्हटलंय.

शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची मोठी सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने करण्यात यावे, मात्र नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असंही म्हटलं आहे.

Advertisement

राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुटी आणि शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर व माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवारी परिपत्रक प्रसिद्ध करून निर्णय जाहीर केला. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आपल्या गावी न गेलेल्या शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement