SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’चा धमाकेदार सेल सुरु, ‘या’ वस्तूंवर मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट..

‘फ्लिपकार्ट’.. ‘ई काॅमर्स’ क्षेत्रातील भारतातील एक मोठं नाव.. ग्राहकांना ‘स्वस्तात मस्त’ वस्तू खरेदी करण्याचं एक हक्काचं ठिकाण… विविध वस्तूंवर ‘बंपर डिस्काऊंट’ देण्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ नेहमीच अग्रेसर असते. त्यासाठी सातत्याने वेगवेगळे सेल जाहीर केले जातात..

‘फ्लिपकार्ट’चा सर्वात मोठा सेल म्हणजे ‘बिग सेव्हिंग डेज सेल’.. या काळात ग्राहकांना विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला जातो.. हा सेल घेऊन ‘फ्लिपकार्ट’ पुन्हा एकदा आलं आहे.. ‘प्लिपकार्ट’च्या ‘बिग सेव्हिंग डेज सेल’ (Flipkart Big Saving Days Sale)ला आजपासून (ता. 12) सुरुवात झालीय..

Advertisement

‘फ्लिपकार्ट’चा हा सेल फक्त तीनच दिवस, म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये काही सर्वोत्तम मिड रेंज स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट्स मिळणार आहे. शिवाय अन्य वस्तूंवरही धमाकेदार ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.

सेलमधील ऑफर्स

Advertisement
  1. पोको एम 4 प्रो (POCO M4 Pro) वर 17% सवलत असून, फोनची किरकोळ किंमत (रिटेल प्राईस) 19,999 रुपये आहे. ऑफरमध्ये हा फोन 16,499 रुपयांत खरेदी करु शकता.
  2. इन्फिनिक्स नोट 11s (Infinix Note 11s) या 6 GB रॅम व 64 GB स्टोअरेज व्हेरिएंटवर 26 टक्के डिस्काउंट आहे. स्मार्टफोनची रिटेल प्राईस 16,999 रुपये असून, ऑफरमध्ये 12,499 रुपयांत खरेदी करु शकता.
  3. रेडमी नोट 10T (Redmi Note 10T 5G)वर 17 टक्के सूट असून, 16999 रुपयांचा हा फोन 13,999 रुपयांत मिळेल…
  4. सॅमसंग गॅलक्सी F22 (Samsung Galaxy F22) या फोनवर 13 टक्के सूट असून, 14999 रुपयांचा फोन 12999 रुपयांत विकला जात आहे.
  5. Redmi Note 10S वर 21% सूट मिळू शकते. फोनची किरकोळ किंमत 18,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर, त्याची डील किंमत 14,999 रुपये इतकी आहे.
  6. Motorola G51 5G ची रिटेल प्राईस 17999 रुपये इतकी आहे. ऑफर अंतर्गत फोनवर 15 टक्के सूट दिली जात आहे. नंतर या फोनची किंमत 15,199 रुपये इतकी झालीय.

स्मार्टवॉच, ट्रिमर आणि लॅपटॉपवरही मोठ्या प्रमाणात सुट दिली जात आहे. स्मार्टवॉचवर 60 टक्के, ट्रिमरवर 70 टक्के, तर लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. बोट (boAt), रिलमी (Realme) कंपन्यांचे पोर्टेबल स्पीकर व हेडफोनवर 80 टक्के डिस्काउंट मिळेल.

स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करीत असाल, तर 7499 रुपयांपासून किमती आहेत. या उन्हाळ्यात स्वस्त एसी खरेदी करता येईल. या सेलमध्ये 19499 रुपयांपासून शानदार एसी उपलब्ध आहेत. शिवाय फॅशन प्रोडक्ट्सवर 50 ते 80 टक्के डिस्काउंट, फर्निचर व मॅट्रेसवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement