SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रणबीर-आलियाचं लग्न झालं रद्द; आलियाच्या भावानं केलाय ‘महत्वाचा’ कौटुंबिक खुलासा

मुंबई :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे दोघे आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे (Wedding News) सतत चर्चेत आहेत. त्यांची तयारीही सुरू झाली आहे. आता लग्नाला अवघे काही दिवस उरले असताना आलिया आणि रणबीर या खास प्रसंगी काय परिधान करणार? त्यांच्या लग्नाला कोण कोण उपस्थित असणार? अशा अनेक गोष्टींची जोरदार चर्चा सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Advertisement

आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने रणबीर आणि आलीयाच्या लग्नाविषयी एक महत्वाचा खुलासा केला आहे. 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरचं लग्न होणार नसल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे या दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रणबीर आणि आलियाचं लग्न तूर्तास तरी रद्द झालं आहे. हे लग्न सुरक्षेच्या कारणासाठी रद्द झाल्याचं समोर आलं आहे. लग्न रद्द झाल्याच्या वृत्ताला आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनीही दुजोरा दिला आहे.

राहुल भट्ट यांनं ‘आज तक’ वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, आलिया आणि रणबीर आता १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध होणार नाहीत. या दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोघांचं लग्न २० एप्रिलच्या आसपास होऊ शकतं अशी शक्यताही राहुलनं व्यक्त केली आहे.

Advertisement

तिथे लग्नतयारीची लगबगही टिपली गेली होती. पण मध्येच भट्ट कुटुंबानं थेट मीडियाकडेच लग्न पुढे ढकलल्याचं सांगितल्यानं सर्वसामान्य चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. लग्नाची चर्चा चहूबाजूला रंगली असताना,वातावरणात ‘रणबेलिया’ रंग भरला असताना या बातमीने आता चाहत्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसून आले आहेत.

Advertisement