मुंबई :
आजकालची तरून पिढी एकवेळ जेवणाशिवाय राहील पण इंटरनेट शिवाय राहू शकत नाही, असं आपण नेहमीच म्हणत असतो. मात्र हीच गोष्ट खरी आहे. इंटरनेट आणि फेसबुकशिवाय या पिढीला करमणार नाही, हे नक्कीच. कारण जेव्हा जेव्हा इंटरनेटचा डाटा संपतो तेव्हा या पिढीच्या लोकांचे त्रेधातीरपिट उडते. अचानक त्यांना एकट वाटू लागतं. कारण दर काही मिनिटांनी Social Media प्लॅटफॉर्मवर अपडेट्स चेक करणे, हे या पिढीसाठी व्यसन बनलेलं आहे.
जेव्हा कधी ऑफिसचे किंवा इतर एखादे महत्वाचे करतांना अचानक इंटरनेट बंद होते आणि तुमच्याकडे काहीच पर्याय नसतो. न तुम्ही लगेच रिचार्ज करू शकता न तुम्हाला इंटरनेट लगेच मिळत. मग अशावेळी काय करणार… तर हताशपणे बसून राहावं लागतं. पण, जर आम्ही सांगितले की, अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत तुम्ही मोफत इंटरनेटची मदत घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि त्यानंतर मोफत इंटरनेट नक्कीच मिळेल.
- Facebook सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटचे डिटेल्स प्रदान करते. ज्याद्वारे तुम्ही Free इंटरनेट मिळवू शकता.
- तुम्हाला फेसबुकचे अधिकृत अॅप उघडावे लागेल. येथे तुम्हाला थ्री डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल म्हणजेच वरच्या उजवीकडे हॅम्बर्गर मेनू.
- आता तुम्हाला Settings आणि Privacy या पर्यायावर जावे लागेल. येथे युजर्सना Find Wi-Fi च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक केल्यावर Facebook तुम्हाला जवळपासच्या सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटची माहिती देईल. येथे तुम्हाला ठिकाणाचे नाव आणि Maps दोन्हीमध्ये माहिती मिळेल. जर तुम्हाला हॉटस्पॉट दिसत नसेल तर, पुन्हा सर्च वर क्लिक करा. त्यानंतर See More वर क्लिक करा.
- तुम्हाला वायफाय हॉट स्पॉट्सबद्दल माहिती मिळेल. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यामध्ये पेड आणि फ्री हॉट स्पॉट वायफाय दोन्ही उपलब्ध आहे.