SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुन्हा चिंता वाढली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ शहरात लॉकडाऊन

मुंबई : 

गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक काळ जगावर कोरोना नावाच्या महामारीने कब्जा केला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाला काही ठराविक देशांनी वेठीस धरले होते. लसीकरणामुळे व निर्बंधामुळे या महामारीचा विळखा आता काहीसा सैल होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

चीनमध्ये कोरोना विषाणूची भीती वाढत असताना नव्या कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. आता ग्वांगझोऊ हे शहर लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे या शहरातील व्यवहार देखील बंद झाले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहर सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, शांघायमधील वाढते रुग्ण देखील सरकारसाठी चिंतेचे कारण आहेत. तिथेही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

दरम्यान आतापर्यंत शांघाय शहरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 26,087 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी फक्त 914 प्रकरणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शांघायमध्ये अनेक कुटुंबांना घरे सोडण्याची परवानगी नाही.

Advertisement

ग्वांगझोऊसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु संसर्ग थांबायचे नाव घेत नाही, त्यामुळे भविष्यात येथेही कठोर पावले उचलली जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात, स्थानिक स्तरावर 23 बाधित रुग्ण आढळल्यानंतर, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्या असून ऑनलाइन शिक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement